*अवैद्य टाल वर ११ टन किंमत ४४ हजाचा चोरी कोळसा पकडुन दोन आरोपीवर गुन्हा दाखल*
*वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांची कारवाई*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ३ किमी अंतरावर फुकट नगर कांद्री येथे दोन आरोपींनी अवैधरित्या टाल वर वेकोलि चा चोरी केलेला ११ टन ३० किलो किंमत ४४,१२० रूपयाचा कोळसा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीने दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.३) जुन ला रात्री ९ वाजता दरम्यान वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे हे आपल्या सुरक्षा रक्षकासह पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की, फुकट नगर कांद्री येथे आरोपी १) अभिषेक ऊर्फ चिंटु सिंह रा. खदान नंबर ६ व २) फारूख अब्दुल्ला शेख रा फुकट नगर कांद्री यांनी अवैधरित्या कोळसा टालवर चोरीचा कोळसा जमा करित आहे. अश्या माहितीने सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे हे आपल्या कर्मचाऱ्या सोबत घटनास्थळी गेले असता दोन आरोपी कोळसा चोरून झाडी झुडपात ठेवलेला कोळश्याचा साठा मिळुन आल्याने तो जप्त करून वेकोलिच्या वजन काटयावर त्याचे ११ टन ३० किलो दगडी कोळसा किंमत ४४,१२० रूपया चा मुद्देमाल कोळसा डेपो मध्ये जमा करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी दोन आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोस्टे चे नापोशि मंगेश सोनटक्के हे पुढील तपास करीत आहे.