*राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या युवका विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी*
*कन्हान व कांद्री युवक काँग्रेस पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकाला निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री नितीन राऊत यांचा विरोधात कांन्द्री येथील युवकाने *अबे साले ऊर्जामंत्री तेरे को सोना नही है तो क्या बाकियो को सोना नहि है क्या कभी भी लाईट बंद करा देता है*
अशी आक्षेपार्ह टिप्पणी करून युवकाने मंत्री महोदयांच्या अपमान केला . अशा प्रकारच्या आक्षेपार्ह टिपणी चा कन्हान युवक काँग्रेसचा वतीने जाहीर निषेध करण्यात आला आणि अशा प्रकारच्या आक्षेपार्ह टिपणी करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करावे जेणेकरुन अशा प्रकारचे गुन्हे समोर कुणीही करणार नाही आणि समाजात अशाने तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचे निवेदन कन्हान पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विलास काळे यांना देण्यात आले .
या प्रसंगी कन्हान युवक कांग्रेस चे आकीब सिद्दीकी , कांन्द्री ग्रामपंचायत सदस्य राहुल टेकाम , युवा नेता अजय कापसिकर , दिपक तिवाड़े , किरण पहाडे , आकाश भांगे , मोहित मलाधारे ,अरविंद मोहबिया , सह आदि पदाधिकारी उपस्थित होते