*कांद्री ग्रामपंचायत येथे बिरसा मुंडा यांना दिली श्रद्धांजलि*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कांद्री ग्रामपंचायत कार्यालय येथे आदिवासी समाजक्रांतीचे जनक व थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या १२२ व्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायत सदस्य , अधिकार्यांनी व कर्मर्चार्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि अर्पित करुन पुण्यतिथि सारजी करण्यात आली .
या प्रसंगी ग्रा.पं. सदस्य धनराज कारेमोरे , प्रकाश चाफले , चंद्रशेखर बावनकुळे , शिवाजी चकोले , राहुल टेकाम , महेश झोडावणे , कर्मचारी पंकज मस्के , ज्ञानेश्वर वैद्य , लिंगायत मॅडम , सह आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .