*पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षकांना प्रदान*
अकोला – मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त , अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने , शासनाने पत्रकारांसाठी लागू केलेल्या शासकीय पत्रकार संरक्षण कायद्याची प्रत आज अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना मराठी पत्रकार परिषदेचे मा अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या हस्ते देण्यात आली , या प्रसंगी अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मिरसाहेब , चिटणीस संजय खांडेकर , ज्येष्ठ पत्रकार विनायकराव काजळे , कमलकिशोर शर्मा , भगवान वानखेडे मुकूंद देशमुख व एल सी बी चे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ उपस्थित होते ,
पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू करावा यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे नेते व राज्य पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती चे संयोजक एस एम देशमुख यांच्या सोबत राज्यातील परिषदेशी संलग्न ३५ जिल्हा पत्रकार संघ, ३५४ तालुका पत्रकार संघा सह पत्रकारांच्या १६ संघटनांनी सतत २१ वर्षे लढा दिला होता , मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी मंडळाच्या दोन्ही सदना मध्ये एकमताने पत्रकार संरक्षण कायद्याला मंजुरी दिली , मा राष्ट्रपती महोदयांनी राज्य विधी मंडळाने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्या च्या अध्यादेशाला मंजुरी दिल्या नंतर हा कायदा महाराष्ट्रात पत्रकारांसाठी लागू झाला आहे , पत्रकारांसाठी संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे , याचे श्रेय मराठी पत्रकार परिषद सह १६ पत्रकार संघटनांच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती व राज्यातील सर्व च पत्रकारांना आहे असे परिषदेचे मा अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी सांगितले ,
जिल्हा पत्रकार संघाच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना शासनाने लागू केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची शासकीय प्रत अकोला शहरातील सर्व पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन कडे त्यांच्या मार्फत पाठविण्याची यावेळी विनंती केली , पोलीस अधीक्षक गावकर यांनी त्याबद्दल आश्वासन दिले व सर्व पत्रकारांना आपल्या शुभेच्छा दिल्या