*रेल्वे ची धडक लागल्याने एका इसमाचा मृत्यु* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल*

*रेल्वे ची धडक लागल्याने एका इसमाचा मृत्यु*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या मौजा गहुहिवरा महामार्गावर येथे कन्हान – नागपुर हावडा डाऊन रेल्वे च्या मधात एका इसमा ला रेल्वे ची धडक लागल्याने झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी युसुफ अब्दुल रशीद खान वय ३० वर्ष राहणार मोमीनपुरा नागपुर हा भारतीय रेल्वे मध्ये कन्हान रेल्वे स्टेशन येथे पाईट्समॅन पोर्टर पोस्ट वर मागील २० दिवसान पासुन कार्य करीत आहे .युसुफ अब्दुल रशीद खान ह्यांची शिफ्ट वाईस ड्यूटी असते . २३ मार्च ला युसुफ अब्दुल रशीद खान ह्यांची ४:०० ते ४:३० शिफ्ट प्रमाणे ड्युटी सुरु होती . तेव्हा युसुफ अब्दुल रशीद खान यांना रेल्वे स्टेशन चे मास्टर नकुल डोंगरे ह्यांनी फिर्यादी ला बोलवुन सांगितले कि गाडी क्रमांक १२८३४ अप अहमदाबाद एक्सप्रेस च्या चालकाने फोन केले कि सायंकाळी ७ ते ७:३० वाजता च्या दरम्यान पोल क्रमांक १११०/२३२५ च्या मधात एका इसमाला रेल्वे ची धडक लागल्याने तो खाली पडला . असे सांगुन व एक पत्र लिहुन हातात दिले व म्हटले कि पोलीस स्टेशन ला जाऊन माहिती दे .या वरुन फिर्यादी युसुफ अब्दुल रशीद खान यांनी सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिली असता पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन कामठी उपजिल्हा येथे शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी युसुफ अब्दुल रशीद खान ह्यांचा तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे ला कलम १७४ जाफौ मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …