*माती परिक्षण प्रशिक्षण संपन्न*
विशेष प्रतिनिधि
*पतंजलि योगपिठ हरिद्वार व नागपूर जिल्हा पतंजलि योग समितीच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकर्यांच्या शेतातील “माती परिक्षण” करण्याकरिता प्रत्येक गावातून एक प्रतिनिधीची निवड करण्याच्या हेतुने दि.1 डिसेंबर 2019 रोजी सावनेर तालुक्यातील बोरुजवाडा येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात आयोजन करण्यात आले होते.
*सदर आयोजनास मा.सचिनजी (केन्द्रीय प्रभारी युवा भारत पतंजलि योगपिठ हरिद्वार),मा.प्रदिपजी काटेर (जिल्हाध्यक्ष भारत स्वाभिमान नागपूर),मा.मानदासजी बसेना (पतंजलि मिहान नागपूर) यांनी मार्गदर्शन करुण शेतातील मातीचे संकलन व परिक्षण कसे करावे तसेच या प्रकल्पातून मीळणारा रोजगार यावर मार्गदर्शन केले.
*याप्रसंगी मा.शशिकांत जोशी (महा.राज्य कार्यकारणी सदस्य),मा.मुकेशजी थापलीयाल (पतंजलि मीहान नागपू),किशोर ढुंढेले (तालुका प्रभारी सावनेर) प्रामुख्याने उपस्थित होते*
*आयोजनाच्या यशस्वीते करीता विनोद काळे,लता ढवळे,सुनीता पाल,आशीष लोधी,शुभम ढवळे,अशोक ब्रम्हवंशी,आदींनी परिश्रम घेतले*
*पतंजलि योगपिठ हरिद्वार व्दारे संचालीत ” सदर माती परिक्षणातून बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध करुण घ्यावयाचा आहे त्यांनी सावनेर तालुका प्रभारी किशोर ढुंढेले यांच्याशी त्वरीत संपर्क करावा संपर्क सुत्र 9325243536,7887979867*