*खंडाळा शिवार एन एच रोडवर टिप्पर ट्रक ची दुचाकीला सामोरून धडक . पती , पत्नी गंभीर जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*खंडाळा शिवार एन एच रोडवर टिप्पर ट्रक ची दुचाकीला सामोरून धडक . पती , पत्नी गंभीर जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर असलेल्या खंडाळा शिवार एन एच ४४ रोडवर एका टिप्पर ट्रक चालकाने दुचाकी वाहनाला समोरून जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक व त्यांची पत्नी गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून टिप्पर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार (दि.१२) जुन ला दुपारी ११ ते ११.१० वाजता दरम्यान अश्विन ददाराव नाकाडे वय २९ वर्ष राह. बोरी सिंगोरी हा आपले पलसर क्र. एम एच ४० बी आर ८७८१ वर त्यांची पत्नी नामे सौ पल्लवी अश्विन नाकाडे हिला डबल सीट बसवुन खंडाळा शिवार नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र ४४ रोड च्या डिव्हायडर जवळ वळण्या करिता उभा असतांना समोरून येणाऱ्या टिप्पर ट्रक क्र. एम एच ४० एन ७२५३ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजी पणाने चुकीच्या दिशेने चालवित आणुन अश्विन नाकाडे यांच्या पलसर दुचाकी वाहनाला समोरून जोरदार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक व त्यांची पत्नीस गंभीर जख्मी केले. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून अश्विन नाकाडे व त्यांचा पत्नीला उपचाराकरिता नागपुर येथे खाजगी रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी अश्विन नाकाडे यांच्या तोंडी तक्रारी वरून टिप्पर ट्रक चालका विरुद्ध अप क्र. ३६२/२२ कलम २७९ , ३३७ , ३३८ भांदवि आर डब्लु १८४, १३४, (अ)(ब), ४, १२२/१७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …