*वराडा बंद टोल नाका परिसरात लावलेले लोखंडी रेलींग चोरी* *पाच आरोपी अटक , मुद्देमालासह वापरात आणलेले दोन चारचाकी वाहन जप्त*

*वराडा बंद टोल नाका परिसरात लावलेले लोखंडी रेलींग चोरी*

*पाच आरोपी अटक , मुद्देमालासह वापरात आणलेले दोन चारचाकी वाहन जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पारशिवनी : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ०५ किमी. अंतरावर असलेल्या वराडा शिवारातील बंद टोल नाका परिसरात महामार्ग लगत लावलेले लोखंडी रँलिंग चोरी करून नेल्याने कन्हान पोलीसांनी पाच आरोपी वर गुन्हा दाखल करून मुद्देमालासह वापरात आणलेले दोन चारचाकी वाहन जप्त करून पुढील तपास सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दि.११ जुन ला सायंकाळी ६ वा. ते रविवार दि. १२ जुन चे सकाळी १० वा. दरम्यान दिलीप श्यामरावजी बावने वय ४६ वर्ष, राह. स्वामी विवेकानंद नगर कन्हान सुपरवायझर टोल नाका हे स्टॉपसह पेट्रोलींग करीत असतांना वराडा शिवार बंद टोल नाका नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र ४४ च्या लगत रोडवर लावलेले लोखंडी ४ रेलींग प्रत्येकी ३ मिटर लांबी अर्धा मिटर रुदीची रेलींग दिसुन आली नाही. लोखंडी ४ रेलींग प्रत्येकी किमत ४,८०० रूपये प्रमाणे एकुण १९,२०० रूपयाचा मुद्देमाल पाच आरोपी १) शिवनंदन नवरंग सिंग वय ३१ वर्ष. राह. राममंदिर च्या मागे टेकाड़ी वेकोली कालोनी, २) कन्हैया काशिराम धुर्वे वय २० वर्ष राह. खदान नं. ४ व ३) सोहेल अब्दुल खान वय २० वर्ष राह. खदान नं.६ यांनी चोरीतील जप्त मुद्देमाल चोरी केल्याचे निष्पन झाल्याने आरोपी ४) शिवचरण रविकिरण शाहु वय २४ वर्ष ५) रविकिरण दुर्गाप्रसाद शाह वय ५५ वर्ष दोन्ही राह. नाका नं ४ शनि मंदिर च्या मागे कळमना नागपुर यांचे जवळुन मुद्देमाल सह उपयोगात आणलेले चारचाकी वाहन १) एम एच ४९ ए टी २३३०, २) एम एच ३१ सि आर ३७८६ ला मुद्दे माल सह जप्त करण्यात आले.
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी दिलीप बावने सुपरवाईझर यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पाच आरोपी विरुध्द अप. क्र. ३६१/२२ अन्वये गुन्हा नोंद करून कलम ३७९, ४११, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून कन्हान थानेदार विलाश काळे यांचे मार्गदर्शनात सहायक पो नि फुलझेले सह सहायक फौजदार गणेश पाल हे पुढील तपास करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …