*शेताच्या गोट फार्मचे १ बोकुड व २ कुत्र्याची चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि -ऋषभ बावनकर
कन्हान – नागपुर – जबलपुर चारपदरी महामार्गा लगत असलेल्या टेकाडी शिवारातील गोट फार्म मधिल १ बोकड व २ कुत्र्ये चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोस्टे ला अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपी चा शोध सुरु केला आहे.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग बॉयपास वळणावर आंनद रंगरावजी इंगोले वय ३५ वर्ष राह. जय हिंद चौक तारसा रोड कन्हान यांचे टेकाडी शिवारात शेतातील गोट फार्म असुन मंगळवार (दि.७) मे ला रात्री ९ वाजता २ बोकड व ५ कुत्रे त्यांचे बॉक्स मध्ये बंद करू ते घरी निघुन गेले. त्या वेळेस त्या ठिकाणी पहारेकरी नसुन सीसीटीव्ही कॅमरे लावले नव्हते. बुधवार (दि.८) मे ला सकाळी ९.३० वाजता दरम्यान आंनद इंगोले गोट फार्मवर गेले असता गेटफार्म चा दरवाजा उघडा दिसल्याने आत मध्ये जाऊन पाहिले तर बॉक्स मधिल जर्मन शेफड जातीचे २ कुत्रे अंदाजे वय ५ महिने किंमत १०,००० रू व बोकुड किंमत १५,००० रूपये असा एकुण २५,००० रूपयाचे प्राळीव प्राणी अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याचे लक्षात आल्याने सदर प्रकरणी फिर्यादी आंनद इंगोले यांच्या तक्रारी वरून पो.स्टे कन्हान येथे आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करित आरोपीचा शोध घेत आहे.