*येसंबा ग्रामपंचायत व्दारे १२ वी उत्तीर्ण विद्यार्थांचा केला सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागा द्वारे बुधवार ला १२ वी चा निकाल जाहीर करण्यात आल्याने येसंबा ग्राम पंचायत कार्यालय येथे प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थांचा सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते शिल्ड, बुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बारावीचे निकाल जाहिर झाल्याने रविवार (दि. १२) जुन ला येसंबा ग्राम पंचायत कार्यालयात बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित ग्राम पंचायत सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते सर्व प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थांना शिल्ड, बुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाट चालीस शुभेच्छा देत सत्कार सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी ग्राम पंचायत उपसरपंच रविन्द्र बांगडे, सदस्या भारतीताई वाघमारे, सदस्या वनिताताई राऊत, अंगणवाडी सेविका मायाताई चकोले, आशावर्कर सुषमाताई गजभिये, मधुकर चकोले, भोजराज घरजाळे, फुलचंदजी इरपाते, कुमार गडे, बालाजी महाल्ले सह गावातील नागरीक आणि बालगोपाल बहु संख्येने उपस्थित होते.