*कन्हान येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा*

*कन्हान येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान येथे वट पौर्णिमा निमित्य विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वटवृक्षाची विधिवत पुर्जा अर्चना करून कन्हान परिसरात वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत येत असुन हिंदु धर्मात या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. मागील दोन वर्षापासुन कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे स्त्रियांना वट पुजा करण्यास मुकावे लागले होते. मात्र यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने स्त्रियां मध्ये वट पौर्णिमे च्या दिवशी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कन्हान परिसरातील विवाहित स्त्रियांनी वटपौर्णिमेंच व्रत करित सोळा शृंगार करून वटवृक्षाची विधिवत पुजा अर्चना , आरती करून झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळुन सात परिक्रमा केली. यावेळी विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य लाभावे अशी मनोकामना करून वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

*सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान*

वटपौर्णिमा दिवशी ला सकाळी सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान परिसरातील वट वृक्षाची वटपौर्णिमा निमित्य जेष्ठ पौर्णिमेला सुहासीनी महिला पतिच्या दिर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पुजा करतात . वड वृक्ष पुजन स्त्री जातीच्या सन्मानाचा सण होय. या वटवृक्षाची सकाळ पासुन पुजा करतांनी महिलांनी चांगलीच गर्दी केली होती. परिसरातील छाया नाईक, शकुंतला चौधरी, अल्का कोल्हे, शोभा अहिर, सुनिता पौनीकर, अनिता वंजारी, सुनिता येरपुडे, लता मोखरकर, सुमित्रा तकीतकर आदी महिलाची उपस्थित राहुन वटपोर्णिमा उत्सव थाटात साजरा केला .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …