*पुण्यश्लोक विद्यानिकेतन खुमारी शाळेचा 98.57% निकाल*
*विद्यार्थ्यांसह पालक वर्गात आनंदाचे वातावरण*
रामटेक तालुका प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – तालुक्यातील आदिवासी बहुल भागात येणाऱ्या नागपूर-जबलपूर महामार्गाच्या कडेला खुमारी येथे असलेल्या पुण्यश्लोक विद्यानिकेतन,खुमारी या शाळेचा निकाल 98.57 % लागल्याने विद्यार्थी व शिक्षकांसह पाल्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
याच औचित्याने दि.17/06/2022 ला पुण्यश्लोक विद्यानिकेतन,खुमारी शाळेत घवघवीत यश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलावून शाळेतर्फे त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.यात खुमारी येथील रहिवासी कुमारी.तनु कैलास चौधरी हिने 86.60% घेऊन शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला.तर कुमारी.नंदिनी इंद्रपाल ठवरे हिने 81.80% गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावले.तसेच कुमारी.प्रिया जयदेव मिसार 79.00%,व कु.सर्वेश काशीनाथ घोडमारे यांनी 79.00 % गुण प्राप्त करून शाळेत तृतीय येण्याचे मान पटकावले.घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका गौडिया मॅडम,बरयेकर सर,तामखाने सर,घोडागाडे सर,ठवकर सर,गोरले सर,कर्मचारी दुर्योधन चौधरी, किरण भाऊ व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पाल्य उपस्तीत होते..