*कांद्री येथे वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – वट पौर्णिमा निमित्य विवाहित स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून वटवृक्षा ची विधिवत पुर्जा अर्चना करून कांद्री परिसरात वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
कांद्री येथे वटपौर्णिमे च्या दिवशी विवाहित स्त्रियांनी वडाची पुजा अर्चना करून आपल्या पतीच्या दीर्घा युष्यासाठी प्रार्थना केली. सकाळची नित्यकर्म उरकल्या नंतर सौभाग्यलंकार परिधान करून वडाचे पुजन करून सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवुन या दिवसा ला महत्व आणुन दिले, तसेच आजन्म सहवास आणि सातजन्माची साथ लाभण्यासाठी स्त्रिया देखील हे व्रत परंपरेनुसार पुजन करत असल्याने मंगळवार (दि.१४) जुन २०२२ ला विवाहित स्त्रियांनी वडाच्या वृक्षांची पुजा अर्चना करून वट पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
*भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गट*
संताजी नगर कांद्री येथे भुमिपुत्र महिला स्वयं सहायता गटा तर्फे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणुन साजरा करण्यात येतो. हया दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेला व्रत करून विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायु ष्य प्राप्त व्हावे म्हणुन वडाच्या झाडाची पुजा अर्चना केली. ग्रा पं कांद्री सदस्या अरुणा हजारे, राखी गभने, वंदना गडे, प्रीती लंगडे, त्रिवेणी हुड, सविता डोकरीमा रे, रीता मस्के, रूपाली हजारे, शुभांगी गडे, जान्हवी गडे, पोर्णिमा ठाकरे, प्रिया मस्के, रीता राजनकर, रानी लोनारे, शोभा मंगर, ज्योती दाडे, मीरा कुंभलकर, रानी कुंभलकर, निर्मला डोकरीमारे, सुनिता सावरकर, स्मिता लांडगे, ज्योती नान्हे, संगीता मोरे, बबली सिंग, भुमी पु-हे, नंदिनी हजारे, रीता शेन्द्रे, वंशिका झलके, पुजा हजारे, पल्लवी शर्मा, सुनिता चटप, प्रियंका मदन कर, सुषमा चवरे, पिंकी राय, मेघा कोल्हे, क्षितिजा नखाते, पुजा गुरव, सारिका उमरेडकर आदी महिलांनी उपस्थित राहुन वटपोर्णिमा उत्सव साजरा केला.
*जय शितला माता मंदीर कांद्री कन्हान*
मंगळवार (दि.१४) जुन ला सकाळी ६ वाजता पासुन वटपोर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. शितला माता मंदीर कांद्री येथे वड वृक्ष व पिंपळ वृक्षा ची विधिवत पुजापाठ करून प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी बेबीनंदा राऊत, वर्षा गि-हे, मंगला बंड, जया खैरकर, रेशमा गि-हे, मोनिका डाये, तुप्ती घरजाळे, नेहा रक्षक, कांचन सिंग, सविता यादव, जय श्री मरघडे, लता बावनकुळे, मिरा यादव, दुर्गा लाडे, आशा गुरव आदी महिला मंडळीनी उपस्थित राहुन वटपोर्णिमा उत्सव थाटात साजरा केला.