*ब्रेकींग न्यूज* *विहिरीत पडलेल्या बिबटाच्या शावकास गावकर्यांनी काढले सुखरुप बाहेर*

*ब्रेकींग न्यूज*

*विहिरीत पडलेल्या बिबटाच्या शावकास गावकर्यांनी काढले सुखरुप बाहेर*

 

*परिसरात वाघ,बिबटाच्या वाढत्या वावरामुळे गावकरी व शेकर्यात भीतीचे सावट*

*तालुका प्रतिनिधी सुरज सेलकर सोबत आशिष लोधी सावनेर*

*सावनेरःसावनेर तालुका मुख्यालया पासून 15 की.मी.अंतरावर असलेल्या कळमेश्वर वन परिक्षेत्रातील सिल्लोरी येथील शेतकरी दिवाकर वडस्कर हे आज सकाळी 8-00 चे दरम्यान आपल्या शेतातील विहिरीच्या पाण्याची पातळी बघण्याकरीता गेले असता विहिरीत वाकताच विहिरीतील पाण्यात बिबट्याचे शावक पडले असल्याचे आढळताच त्यांनी परिसरातील शेतकर्यांना बोलावून घेत सदर घटनेची सुचना सावनेर पोलीस स्टेशन ला दीली असता सावनेर पोलिसांनी लगेच ही सुचना कळमेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी सौ.ए.आर.नौकरकर यांना सुचना देत रेस्कु टीम ला सोबत घेऊण घटनास्थळी धाव घेतली*


*विहीरीत पडलेले शावक इतके छोटे होते की ते जास्तवेळ विहिरीत जिवंत राहू शकत नसल्याचा अंदाज गावकर्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवत वन परिक्षेत्र अधिकारी व रेस्कू टीम पोहचण्याआधी त्या शावकास सुखरूप विहिरीच्या बाहेर काढून घेतले तोवर कळमेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी व रेस्कू टीम च्या स्वाधीन केले असता वन अधिकारी व रेस्कू टीमने विहिरीत पडल्याने त्या शावकास काही गंभीर ईजा तर नाही ना व विहिरीत पडल्याने व एकच लोकांची गर्दी बघून घाबरलेल्या शावकास पुढील उच्चस्तरीय तपासणी करिता वन परिक्षेत्र नागपूर येथे रवाना करण्यात आले असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सौ.नौकरकर यांनी दिली आहे.*


*सदर शावक हा आपल्या आई सोबत असून विहिरीत पडल्याचा अंदाज प्रथमीक स्तरावर व्यक्त केल्या जात असुन सदर शावक दुरुस्त होताच तसेच त्या दरम्यान कळमेश्वर,खापा वन परिक्षेत्रात त्याच्या आईच्या वास्तव्याचा शोध लावून त्या शावकास आईच्या जवळ लवकरात सोडण्याचा विचार वरिष्ठ वन अधिकारी घेत आहे*


*सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील वन परिक्षेत्रात वाघ बीबट् यांचा बावर असल्याच्या माहिती व बातम्या सातत्याने पुढे येत आहे त्यामुळे नागरीका सह शेतकरी,शेतमजूर बांधवात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे*
*सिल्लोरी परिसरातील शेतातील विहिरीत पडलेल्या शावकास सुखरुप बाहेर काढण्यात दिवाकर सटवार,रमेश आहाके,दिली विलाल गौरखेडे,हेमराज रामटेके आदिंनी परिश्रम घेतले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …