*राजा भोज भवन येथे योग दिवस उत्साहत साजरा*
काटोल – सुदृढ निरामय व निरोगी शरीरासाठी भारतातील प्राचीन ऋषी मुनींनी सांगितलेला योगा अभ्यास आज सर्वमान्य झाला आहे. आपल्या देशातील योग कलेला जागतिक मान्यता मिळाली असून गेल्या आठ वर्षापासून जागतिक स्तरावर 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका व ज्या ठिकाणी नियमित योग सराव केला जातो त्या ठिकाणी योग दिवस साजरा करण्यात येतो. स्थानिक नबीरा ले आउट येथील *राजा भोज बालसंस्कार भवन* येथे पतंजली योग पीठ, अखिल भारतीय भोयर पवार समाज महासंघ, आणि योग अभ्यास मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन लता कडू माजी नगरसेविका यांनी तर अध्यक्षस्थानी पतंजली योगपीठ हरिद्वार चे योग शिक्षक अशोक कडू होते. आयुष मंत्रालय यांचे योग दिवसाचे प्रोटोकॉल नुसार योग दिवसासंबंधी सर्व योग क्रियांचे प्रात्यक्षिक योग शिक्षक किशोर परिहार व शोभना बोडखे यांनी उपस्थितांकडून करून घेतले.
सूत्रसंचालन मनोहर पठाडे, प्रास्ताविक पिलाजी थोटे तर आभार सचिन अंबाडकर यांनी मानले.
योग दिवसाला कॉम्पिटिशन योगा क्लास चे संचालक तुषार डोईफोडे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसह उपस्थित होते भोयर पवार महासंघाचे वसंत खवशे, अरुण मुन्ने, विजय डोंगरे, वसंतराव देशमुख, विलास फरकाडे, विजय खवशे, बळीराम भादे, मंदा भादे आदी पदाधिकारी उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा संघाचे जयंत कळंबे, सोमदत्त हिवसे, आशुतोष शिरोडकर, विष्णू माचेवर, निखिल नवघरे, प्रवीण लक्षणे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याचप्रमाणे स्थानिक योगा अभ्यास मंडळाचे पुरुष व महिलांनी मोठ्या प्रमाणावर योग दिवसानिमित्त योग्य अभ्यास चा लाभ घेतला राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.