*पतंजली समन्वयक समिती कडून नरखेड तालुक्यात अनेक स्थळी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा*
नरखेड- येथे पुरुषोत्तम थोटे पतंजली योगपीठ हरिद्वार आजीवन सदस्य समन्वय समिती तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षते मध्ये..ते स्थळ पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड पतंजली समन्वयक समिती कडून नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
योग व आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीला अनेक वर्षे पासून ऋषी मुनींच्या सहकार्य मधून परंपरा नी मिळालेली आमुल्य अशी देण आहेत. करा योग राहा निरोग या म्हणी प्रमाणे जर आपण नियमित योग साधाना सराव केला तर नक्कीच आयुष्य हे निरोगी व वय वाढणेस मदत होते . हे महत्त्व लक्षात घेउन योगाची निमीती झाली असावी यांच्या प्रसार हा जनसामान्यांना पर्यंत होणे साठी ११ सप्टेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्राच्या १९३ देशापैकी १७५ देशाने या प्रस्तावाला पाठिंबा देउन योग दिवस सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जुन २०१५ ला मोठ्या उत्साहात साजरा केला गेला व यावर्षी ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यांच्या अनुशगाने
नरखेड तालुका मध्ये पतंजली समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अतिऊत्साहात योग कार्यक्रम घेण्यात आला.
नरखेड येथे स्थळ पंढरीनाथ महाविद्याल येथे पुरुषोत्तम थोटे पतंजली योगपीठ हरिद्वार आजीवन सदस्य समन्वय समिती तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षते मध्ये. मर्गदर्शन करतांना म्हणाले दोनशक्तीचा येथे वावर आहेत दुर्जन शक्तीला वाव न देण्याचं काम पोलीस ,न्यायालय करत त्याच प्रमाणे शरीरात दुर्जन म्हणजे व्याधी न वाढूदेण्याच काम योग प्राणायम करतंय असे उदाहरणे देऊन महत्व पटऊन दिले अतिथी डॉ,जयंतजी जवनजाळ प्रिंशिपॉल यांनी योगाचे अनेक फायदे बद्दल माहिती दिली… ,योगशिक्षक म्हणून विनायक रेवतकर, हितेश घोरशे यांनी सुंदरसे प्रात्यक्षीके केलीत, तरी गावकरी जनतेची बरीच ऊपस्थिती शामराव बारीई ,मदन कामडे ,नरहरि बांदरे ,सुरेश सेंदरे, अशोक वेरुळकर,रामेश्वर सेंदरे,दीपक ढोमने ,ओम कुर्वे,बागडेसर ,पुरुषोत्तम मस्के,यांनी मार्गदर्शन केले , मित्तल कामडे,वैशाली रेवतकर,रजनी थोटे कविता सेंदरे, गीता दुहिजोड , सोनाली रेवतकर,बरीचशी बंधू माता बघिणीनी योग प्राणायम करून महती जाणून घेतली विशाल रेवतकर,विवेक बालपांडे,लखन कळम्बे जयदीप गोहडे चे व्यवस्थपन होते.आभार संजय कामडे यांनी तर शांती पाठाने सांगता झाली.
बेलोना येथे महाराणा सभागृहात प्रमुख उपस्थित मा.माजी शिक्षण सभापती उकेशभाऊ चौव्हान व प.स.सदस्या सौ.हेमलता सातपुते ,प्रा.वामन बन्सोड,राहुल चौव्हान ,हकम मार्यावत यांच्या प्रमुख उपस्थितीत योगशिक्षिका ज्योती बन्सोड आयोजक यांनी योगाचे मार्गदर्शन करून सकाळी साडेपाच ते सात पर्यत योगाचे धडे दिले.या कार्यक्रमाला गावातील महिला ,पुरूष वमुले योग साधक संख्या ५० उपस्थित होती .योगशिक्षिका ज्योती बन्सोड यांचा सत्कार करण्यात आला .सौ.वनिता रामदे,मंदा मेंढे,दुर्गा नागपूरकर ,कविता रेवतकर ,जया दिवान इ. महिलांनी सहकार्य केले.
करंजोली या गावात स्थळ जिल्हा परिषद शाळेत योग दिवस साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उस्थिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मा.श्री मनकवडे सर, माझी पोलीस अधिकारी मा श्री प्रल्हाद जी धवड, यांनी योगाचे फायदे सांगितले योग शिक्षक आकाश गाखरे, ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद जी धानोरकर, नेहरू युवा केंद्र नागपूर येथील स्वयंसेवक प्रिती कुमेरियाताई, अंगणवाडी मदतनीस सौ रेखाताई वानखडे , महिला स्वयंसहायता बचत गट सीआरपी सौ सविताताई धवड, सतिश धानोरकर, आयुष विरखळे, शाळेचे विद्यार्थी आणि इतर ३० ग्रामस्थ उपस्थित होते.