*मोठी बातमी*
*बखारी शेत शिवारात वीज पडुन एक महिला मृत्यु , तर सात मजुर जख्मी*
*४ मजुर महिलेचा आयसीओ मध्ये तर १ पुरूष व १ महिलेचा जनरल वार्डात उपचार सुरू*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – शहरा पासुन उत्तरेस १५ किमी अंतरावर असलेल्या पेंच नदी काठावरील बखारी (पिपळा) येथे शेतात कपाशी च्या बियाची (सरकीची) लावण करित असतांना दुपारी वादळ वाऱ्यासह शेतात अचानक वीज पडल्याने सरकी लावणाऱ्या एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यु झाला असुन अन्य दोन पुरूष व सहा महिला असे आठ मजुर जख्मी झाले .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बखारी येथील शेतकरी चंद्रभान गोंडाणे हयानी श्री पदमाकर गोपाळरावजी पांडे यांचे शेत वाहण्या करिता ठेक्याने करून सोमवार (दि.२०) जुन ला सकाळी शेतात मजुरा सह जाऊन कपासी च्या बियाण्याची (सरकीची) लावण करण्यास सुरूवात केली. दुपारी ३.३० वाजता दरम्यान वादळ वारा येऊन अचानक जोराच्या कडाक्यासह लावणीच्या शेतात वीज पडल्याने सरकी लावणारे दोन पुरूष व सहा महिला जख्मी झाले. त्याना तातडीने उपचारा करिता गावातील ओम नी चार चाकी वाहनाने कन्हान परिसरातील खाजगी वानखेडे दवाखाण्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन मायाबाई कैलास केवट वय ४५ वर्ष राहणार बखारी यांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याचे घोषित केल्याने कामठी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदना करिता मृतदेह पाठविण्यात आले. तसेच १) मिराबाई चंद्रभान गोंडाणे वय ४४ वर्ष , २) प्रभावती ईश्वर भिमटे वय ५२ वर्ष , ३) यमुनाबाई मनोहर केवट वय ४६ वर्ष , ४) बाली सुरेश गोंडाणे वय ३५ वर्ष सर्व राहणार. बखारी याची प्रकृती चिंताजनक असल्याने आयसीओ मध्ये उपचार करण्यात येत आहे. व १) वर्षा सुरेश गोंडाणे २) दुर्गेश मनोहर केवट वय १८ वर्ष दोन्ही राहणार. बखारी यांचा जनरल वार्डात उपचार सुरू आहे. आणि नामदेव बाझनघाटे वय ६५ वर्ष राहणार. बखारी यांच्या छाती मध्ये थोडे दुखने असल्याने औषधोपचार करून घरी नेण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत बखारी सरपंच नरेश ढोणे हयांनी जख्मींना खाजगी वाहनाने कन्हान येथे उपचाराकरिता नेले. मंडळ अधिकारी बी जी जगदाळे , तलाठी शितल गौर , कोतवाल सेवक भोंडे हयानी घटनास्थळी व दवाखान्यात भेट देऊन घटनेचा अहवाल तयार करून तहसिलदार प्रशांत सांगडे पारशिवनी हयांना पाठविले.
बखारी गाव शेतशिवारात अचानक शेतात विज पडल्याने सरकी लावणाऱ्या एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर दोन पुरूष व पाच महिला मजुर जख्मी झाल्याने या मजुरांच्या कुंटुबाना शासना ने तातडीने आर्थिक साहायता करण्यात यावी. अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच नरेश ढोणे, शेतकरी रविंद्र चौधरी सह ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केली आहे .