*भाजपा द्वारे श्यामा प्रसाद मुखर्जी यांना दिली श्रद्धांजलि*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा कन्हान शहर द्वारे भारतीय जनसंघाचे संस्थापक,प्रखर राष्ट्रचिंतक , महान शिक्षातज्ञ , श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या ६९ व्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन रामभाऊ दिवटे यांच्या जनसंपर्क कार्यालय तारसा रोड चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या हस्ते व भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि वाहुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कामेश्वर शर्मा , सुनिल लाडेकर , विक्की सोलंकी , महेंद्र चव्हान , रंजीत शिंदेकर , तुलेषा नानवटकर , सुनंदा दिवटे , रिंकेश चवरे , मयुर माटे , शैलेश शेळके , अमोल साकोरे , रवि महाकाळकर , दिपचंद शेंडे , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते .