*बोरडा टोल नाक्याचा डिवाईडर ला ट्रक ची जोरदार धडक , डिझेल टँक फुटुन लागली आग*
*आगीत सामानासह पुर्णपणे ट्रक खाक होऊन १२ लाखांचे झाले नुकसान*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला आरोपी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर असलेल्या नागपुर जबलपुर चारपदरी नागपुर बॉयपास महामार्गावरील बोरडा टोल नाक्याच्या डिवाईडर ला भरधाव वेगाने ट्रक ने जोरदार धडक मारल्याने डिझेल टँक फुटुन लागलेल्या आगीत ट्रक सह सामानाची राख रांगोळी होऊन १२ लाखाचे नुकसान झाले असुन कुठलिही जिव हानी झाली न झाल्यने पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार (दि.२३) जुन ला सकाळी ५.५० वाजता दरम्यान ट्रक क्र.आर जे – ११- जी ८३१७ चा चालक हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ने जबलपुर रोड कडुन आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवित आणुन त्याने टोल चे डिवायडरला जोरदार धडक मारल्याने ट्रक च्या उजव्या बाजुला असलेले डिजल टँक फुटुन अचानक ट्रक मध्ये आग लागल्याने ट्रक चालक त्यांचा कंडक्टर हे कसेतरी बाहेर निघाले. तेव्हा फायर ब्रिगेड ला फोन करून बोलावुन आग विझविण्यात आली असुन ट्रक मध्ये पार्सल इलेक्ट्रीकल वस्तु व सामन होते. ते संपुर्ण ट्रक सहित जळुन खाक होत राख रांगोळी होऊन अंदाजे १० लाख रूपयाचे नुकसान झाले असुन या अपघात टोल नाक्याचे वेट मशीन व प्रोफायलर हे सुद्धा जळुन खाक झाल्याने अंदाजे २ लाख रूपयाचे नुकसान झाले असे एकुण १२ लाखांचे नुकसान झाले असुन अपघातात कोणालाही शारिरीक इजा झालेली नाही. अपघातास व नुकसान होण्यास ट्रक क्र आर जे – ११- जीबी – ८३१७ चा चालक हाच कारणी भुत असल्याने टोल नाक्यावर प्रत्यक्ष ड्युटीवर असले ले फिर्यादी राहुल प्रेमदास मनगटे वय २९ वर्ष राह. पिपरी-कन्हान मस्जिद जवळ यांचे तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोस्टे ला ट्रक चालका विरूध्द अपराध क्रमांक ३८४/२२ कलम २७९ , ४२७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .