*वाळू चोरटयांनी केली मंडळ अधिका-यास मारहाण*
*तिघांवर अ-जामीनपात्र गुन्हाची नोंद*
*तलाठींचे लेखनीबंद आंदोलन*
*सामान्य नागरिकांना नाहक त्रास…*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*
*सावनेर – रात्री गश्तीवर असलेल्या मंडळ अधिका-याने विना राॅयल्टी काढलेला वाळूचा ट्रक पकडल्याने मंडळ अधिका-यांस मारहाण केली.ही घटना सावनेर खापा रोड वरील कोदेगांव शीवारात रात्री 11-30 च्या सुमारास घडली.शारद नांदुरकर असे फिर्यादी मंडळ अधिका-यांचे नांव असून रोशन महंत रा. खानगांव, उत्तम कापसे रा. सावनेर,प्रफुल कापसे अशी आरोपींची नांवे आहे*
मंडळ अधिकारी शरद नांदुरकर
मिळालेल्या माहिती नुसार सावनेर तालुक्यात काही बेरोजगार तरूणांना या व्यवसायातून लगबगीने पैसा कमावून डाँन बनन्याचा व गळ्यात पच्चास तोला घालून मीरवीन्याचा छंदानी हेरले असून त्याकरिता एखादया राजकिय पक्षाचे वरदहस्त प्राप्त करून तरूण मंडळी वाळू चोरीचे काम करीत आहे. दि. 3 डीसेंबर रोजी रात्री गश्तीवर असलेले तहसिल कार्यालयाचे कर्मचारी मंडळ अधिकारी शरद नांदुरकर,तलाठी पवन बागडे,चालक राजु ब्रम्हराक्षे हे रात्री 11-30 च्या सुमारास तहसिल कार्यालयातील टाटा सोमु ने कोदेगाव मार्गे रेतीघाटावर जात असतांना त्यांना ट्रक क्र.एमएच 40 एके 3699 हा ट्रक 6 ब्रास 62,400 रू कींमतीची वाळू घेउन सावनेरच्या दिशेने येतांना दिसला. मंडळ अधिका-यांनी ट्रकला कोदेगाव जवळ हात देत थांबविले व राॅयल्टीची विचारणा केली असता त्यावर ट्रक चालक राजेश धुर्वे याने राॅयल्टी विसरल्याचे सांगितले.यावर मंडळ अधिका-यांनी याची सुचना सावनेर तहसिलदार दिपक करांडे यांना केली. यावर तहसिलदार यांनी ट्रक पकडून आणण्यास सांगितले. परंतू ट्रक चालकाने मालकास फोन करून बोलविले. यावर घटना स्थळी रोशन महंत रा. खानगांव,उत्तम कापसे रा. सावनेर,प्रफुल कापसे यांनी संगणमत करून शासकिय कामात अडथळा आणत व आपली दहशत निर्माण करण्यासाठी मंडळ अधिका-यास लात व हातबुक्कयाने मारहाण करीत जख्मी केले.व जिवे मारण्याची धमकी दिली.यावर फिर्यादी मंडळधिकारी शरद नांदुरकर यांच्या लेखी तक्रारीवरून खापा पोलीसांनी भादंवी 353, 332,186,187,188,379,504,506,34 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.*
*यावेळी वाळू चोरटे पसार झाले असून सर्व तालुका तलाठयांनी आज लेखनी बंद आंदोलन पुकारत मारहाण करणा-या रेती चोरांना पकडण्याची मागणी केली आहे. तलाठयांच्या लेखनी बंद आंदोलनामुळे तहसिल कार्यालय ओस पडले असून ग्रामिण भागातून पैशे खर्च करीत काम पाडून आलेल्या शेतक-यांना आपल्या घराकडे परत फिरावे लागले हे विशेष…*