*योगेश रंगारी यांची नागपुर खंडापीठाच्या आदेशाने नगर परिषद उपाध्यक्ष पदी नियुक्ती*
*काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांनी विजय मिरवणुक काढुन जल्लोष साजरा केला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिष येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर माजी उपाध्यक्ष योगेश उर्फ बाबू रंगारी यांची पुन्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याने काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलदीप मंगल कार्यालय ते कन्हान नगर परिषद पर्यंत विजय मिरवणुक काढुन विजय जल्लोष साजरा केला .
वर्ष २०२० मध्ये कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे काँग्रेस ,शिवसेना आणि प्रहार ने सत्ता स्थापन केली असुन योगेश रंगारी यांना कन्हान नगर परिषद चे उपाध्यक्ष करण्यात आले होते . त्या नंतर भाजप आणि काँग्रेस च्या दोन नगरसेवकांनी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर करून योगेश रंगारी यांना नप उपाध्यक्ष पदावरुन हटवून शिवसेने चे डायनल शेंडे यांची उपाध्यक्ष पदी निवड केली होती . या प्रकरणी योगेश रंगारी यांनी मुंबई उच्च न्यायालया च्या नागपूर खंडपीठात न्यायासाठी अपील केले होती. ज्यावर न्यायालयाने पीठासीन अधिकारी व नगराध्यक्ष करुणा आष्टणकर यांनी विशेष सभेत मतदान करणे , पुर्ण बैठक १४ मिनटात संपवणे , नगरसेविकांची खरीद फरोख्त अश्या अनेक मुद्द्यांचा विचार करून २० जून २०२२ रोजी न्यायालया द्वारे १२ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित विशेष सभेला अवैध घोषित करुन योगेश रंगारी ला पुन्हा नप उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली . नागपुर खंडापीठाच्या आदेशा नंतर योगेश रंगारी हे पुन्हा नप उपाध्यक्ष झाल्याने काॅंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुलदीप मंगल कार्यालय पासुन विजय मिरवणुक काढण्यात आली असुन ही मिरवणुक आंबेडकर चौक येथे आली असता तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत राष्ट्रीय महामार्गा ने नगर परिषद येथे पोहोचली असता तिथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले व सर्वांना मिठाई घालुन विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला .
या प्रसंगी काँग्रेस नागपुर जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे , कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे , उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे , धनंजय सिंग, महिला शहर अध्यक्ष रिता बर्वे , नगरसेवक मनीष भिवगडे , नगरसेविका गुंफा तिडके , रेखा टोहणे , पप्पू जामा , शिवाजी सिंग , आनंद नायडू , सदर आलम , अभय रेड्डी , अजय कापसीकर , राजा यादव , सतीश भसारकर , शरद वाटकर , सह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .