*शेताच्या वाद विवादातुन नातेवाईकाने महिलेस अश्लील शिवीगाळ करून दिली जिवे मारण्याची धमकी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस सात किमी अंतरावर असलेल्या मौजा खोपडी शेत शिवारात आरोपीने ज्योती गजभिये हिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी चा शोध सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार ज्योती विनोद गजभिये राजु गुलाब जामगडे हे नातेवाईक असुन बहीण व भाऊ आहे. गुरूवार दि.२३ जुन ला सकाळी ७ ते ८ वाजता दरम्यान खोपडी शेत शिवारात ज्योती गजभिये हया शेताची मशागत करीत असतांना आरोपी राजु जामगडे हा शेतात आला व ज्योती गजभिये हिला धमकी देत हे शेत माझे आहे आणि मी आपल्या नावा ने करून घेतले आहे. अश्लील शिवीगाळ करून तु हया शेताची वाही जुपी करायची नाही. आता तु जर दिसली तर तुला आणि तुझ्या परिवारातील लोकांना हयाच शेतात गाडुन तुमच्या सगळ्यांची समाधी येथेच बनवीन अशी धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी ज्योती गजभिये यांच्या तोंडी तक्रारी वरून आरोपी राजु जामगडे यांचे विरुद्ध कलम २९४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.