*वारेगाव राख संचय तलावा लगतच्या शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यास रस्ता बनवुन द्या*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – महाजनको ने वारेगाव राख संचय तलावा करिता शेती हस्तांतरित केल्याने उर्वरित शेतात नहरा ने पाणी सिंचन बंद होऊन ये-जा करण्याकरिता व्यवस्थित रस्ता नसल्याने शेतीला ये-जा करिता रस्ता बनवुन देण्यास सहकार्य करण्याची मागणी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयाना शेतकरी देवराव पांडे व इतर वारेगांव येथील त्रस्त शेतकरी नागरिकांनी केली आहे.
मौजा वारेगांव ता कामठी जि नागपुर येथील त्रस्त शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी व शेतात बी, बीऱ्याणे, पिक माल वाहतुक करण्यासाठी रस्ता नसल्याने सर्व शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. शेताच्या शेजारी महाजेनको कंपनीचा राख संचय बंधारा असुन महॉजेनकोने आपल्या सोयीसाठी रस्ता बनविला असुन आम्हा शेतकऱ्यांचे काय ? याबाबत ग्राप पंचायत वारेगांव मार्फत सन २०११-१२ ला रितसर ठराव महाजनको व्यवस्थापक खापरखेडा यांना देण्यात आला. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. दखलही घेतली नाही. त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत चा ठराव २०१९-२० ला देऊन पत्राचार केला. तरी आमच्या ठराव, पत्राचा विचार करण्यात आला नाही. तसेच पुर्वी शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागा द्वारे पाणी शेती सिंचनासाठी मिळत होते. जेव्हा पासुन महाजन कोने शेती हस्तांतरीत केल्याने शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाचे पाणी मिळत नसलयाने शेतकऱ्यांवर उपास मारीची वेळ आली आहे. आम्हा शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने व नहराचे पाणी मिळत नसल्याने अनेकांच्या शेती पडीत राहुन आम्हा शेतकऱ्यांना आम्हच्या कुटुंबांचा उदरनिर्वह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला असुन आम्हा शेतकऱ्यां वर उपासमारीची वेळ आली आहे. या बाबत संबंधित विभागाला नेहमी पत्राचार केला. तरीही आज पर्यत कोणत्याही प्रकारची कार्यवाही व दखल घेतली नाही. यास्तव आपणास विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यास सहकार्य करावे. या मागणीचे निवेदन शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयाना त्याच्या घरी भेटुन देण्यात आले.
या प्रसंगी माजी सरपंच देवराव पांडे, माजी उपसरपंच मुकुंदराव गोडाळे, भारतीय भाई विकास मंडळ राष्ट्रीय महासचिव दिलीप मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता गुंडेराव भाकरे , सिताराम पांडे, राकेश पांडे, दिलीप गोडाळे, गोपाल गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.