*कन्हान परिसरात योग दिवस थाटात साजरा* *विविध ठिकठिकाणी योगा कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान परिसरात योग दिवस थाटात साजरा*

*विविध ठिकठिकाणी योगा कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान परिसरात जागतिक योग दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन योगासन करुन व उपस्थितांना सामग्री वाटप आणि सतकार करुन योग दिवस थाटात साजरा करण्यात आला .

*कन्हान पिपरी प्रभाग क्रमाक ६*

कन्हान पिपरी प्रभाग क्रमाक ६ पिपरी च्या नगरसेविका संगीता खोब्रागडे यांच्या वतीने मागील तीन महिन्या पासुन योगासन नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येत आले असुन आज योगा दिना निमित्याने योग प्रशिक्षीका कु . लता दुधवडे मॅडम यांचा सत्कार करण्यात आले असुन आयोजित योग संबधी व्याख्यान देतांनी योग शिक्षिका लता दुधवडे यांनी रोगमुक्तीवर भरपुर माहीती देऊन योगआसने करून घेतला . सर्व रोगमुक्त वर भरपुर माहिती देऊन , दुर्विचार दुर्भावना दुगुर्ण , दुर्भावना दुर्गुन , दोष , अमानवीय प्रलापासून मुक्तता योग प्रशिक्षण शिविर दररोज शुरु आहे व राहील . या कार्यक्रमाला उपस्थित सौ . संगिता खोब्रागडे ( नगर सेविका) , आशावर्कर सौ . लिला बर्वे , वर्षा उरकुडे हुना बुरडकर , सुषमा चोपकर ( सेविका) उपास राव खोब्रागडे राजकुमार बर्वे प्रदिप कुमारजी तुलजाताई रामटेके , शीला , खोब्रागडे , अनिता गजभिये गीरजा नारनवरे , शिला बाग डे , गीता मे श्राम भोजना वर्षा बावणे , नेवारे माया मेश्राम लक्ष्मी मेश्राम भारती साहानी ,असंख्य मुलेमुली , महिला पुरुष वर्ग दररोज प्रशिक्षण योगसन साठी उपस्थित होते .

*चेतनात्त्मक ध्यान योग केंद्र व काॅंग्रेस पार्टी*

चेतनात्त्मक ध्यान योग केंद्र व काॅंग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाचे अध्यक्षा मा.रश्मी बर्वे जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली योगासन करण्यात आले . त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष रश्मी बर्वे व श्री राजेंद्र मुळक पुर्व अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटि यांच्या द्वारे भेट दिलेल्या 10 योग चटया ( mat) सौ रश्मी ताई बर्वे यांच्या हस्ते वितरित करून योग दिवस थाटात साजरा करण्यात आला . यावेळी प्रमुख्याने उपस्थित श्री मधुकरजी धोपाडे जे निशुल्क योगा प्रशीक्षण देतात त्यांची स्तुति जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी केली .
या प्रसंगी मधूकर धोपाडे , विलास जेन्ज्वाल , मिलिंद मेश्राम , दिलीप ठाकरे , प्रदिप बावने , आनंद चाहांदे , सुप्रित बावने , इश्प्रीत बावने , छाया नाईक , सवीता मोहंकर , अनराधा कॉलरा , कलावती डांगे , शितल बांने , मोन वाडीभ्स्म्मे , सौ खंडेलवाल , सीमा ठाकरे सह आदि नागरिक उपस्थित होते .

*दखने हायस्कुल येथे विश्व योग दिन साजरा* 

जिल्हा क्रीडा अधिकारी नागपुर मार्फत बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे दि.21 जुन योग दिन रोजी शाळेचा प्रांगणात शिक्षक कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थी यांनी योगासन करुन जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
योग दिनाची सुरवात सरस्वती वंदना घेऊन करण्यात आली तसेच विविध योगासने व सूर्यनमस्कार प्राणायाम आसने प्रकार घेण्यात आले .
कार्यक्रमाचे संचालन क्रिडा शिक्षक माधव काठोके यांनी केले .
या प्रसंगी सर्व उपस्थित शिक्षकांचे मुख्यध्यापिका श्रीमती विशाखा ठमके मॅडम यांनी आभार मानले.

*आदर्श हायस्कुल कन्हान*

कन्हान तारसा चौक येथील आदर्श हायस्कुल येथे जागतिक योग दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व शिक्षकांनी व विद्यार्थांनी योगासन करुन जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला .
या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …