*ब्रेकिंग न्यूज* *झोपडपट्टी सिल्लेवाडा येथे घरगुती जुने वादावरुन एका इसमाला केले गंभीर जख्मी , आज उपचारा दरम्यान मृत्यु* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून खापरखेडा पोलीस स्टेशन ला तीन आरोपी विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल*

*ब्रेकिंग न्यूज*

*झोपडपट्टी सिल्लेवाडा येथे घरगुती जुने वादावरुन एका इसमाला केले गंभीर जख्मी , आज उपचारा दरम्यान मृत्यु*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून खापरखेडा पोलीस स्टेशन ला तीन आरोपी विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल*

खापरखेडा – खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत ०६ कि.मी अंतरावर असलेल्या वार्ड नं . ०४ झोपडपटटी सिल्लेवाडा येथे घरगुती जुने वादावरुन तीन आरोपींनी संगमत करुन फिर्यादी च्या पतीला हातबुक्याने व लाठी ने माराहण करुन गंभीर जख्मी केल्याने त्याला उपचारा करिता मेयो रुग्णालय नागपुर येथे भरती केले असता उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने खापरखेडा पोलीसांनी फिर्यादी पत्नी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक २८ जुन ला सायंकाळी ०७:०० वाजता च्या दरम्यान आरोपी क्र.१ ) ब्रिजमोहन बनवारीलाल शाक्य वय ५६ वर्ष , २ ) सौ दमयंती ब्रिजमोहन शाक्य वय ५० वर्ष व वय १७ वर्षीय विधीसंघर्ष बालक तिन्ही रा.वार्ड नं . ०४ झोपडपटटी सिल्लेवाडा यांनी संगनमत करुन घरघुती जुने वादावरुन झगडा करुन हातबुक्कीने व लाठीने मारपीट करुन फिर्यादी चे पती नामे – जगमोहन बनवारीलाल शाक्य ( मृतक ) , वय ५० वर्ष रा.वार्ड नं .०४ झोपडपटटी सिल्लेवाडा यास गंभीर जख्मी केले असुन आरोपीतांनी सुनिता शाक्य यास सुद्धा मारहाण केली असता फिर्यादी ने आपल्या पतीला प्रथम उपचार कामी खापरखेडा सरकारी दवाखाना मध्ये दि . २८ जुन २०२२ रोजी नेले असता तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारा कामी मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केल्याने मृतकास मेयो हॉस्पीटल नागपुर येथे भरती केले असता उपचारा दरम्यान आज शनिवार ०२ जुलाई २०२२ चे सकाळी १०:३० वाजता च्या दरम्यान डाॅक्टरांनी त्यास तपासुन मृत घोषीत केले .
सदर प्रकरणा बाबत खापरखेडा पोलीसांनी फिर्यादी नामे सुनिता जगमोहन शाक्य वय ४० वर्ष , रा.वार्ड नं ०४ झोपडपटटी सिल्लेवाडा यांचे तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे ला आरोपी विरुध्द कलम ३०२ , ३२३ , ३४ भांदवी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन आरोपी १ ब्रिजमोहन बनवारीलाल शाक्य
व विधीसंघर्ष बालक यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि श्री पिसे हे करीत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …