*कन्हान ला उदयपुर येथे झालेल्या निष्पाप हिंदु युवकाच्या घृण हत्येचा निषेध* *आरोपी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून फासी ची शिक्षा देण्याची मागणी* *भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांन मार्फत राज्यपाल ला निवेदन*

*कन्हान ला उदयपुर येथे झालेल्या निष्पाप हिंदु युवकाच्या घृण हत्येचा निषेध*

*आरोपी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून फासी ची शिक्षा देण्याची मागणी*

*भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिकार्यांचे पोलीस निरीक्षकांन मार्फत राज्यपाल ला निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – राजस्थान राज्य येथील उदयपुर शहरात धनमंडी येथे निष्पाप हिंदु युवक कन्हैयालाल तेली यांची दोन नराधमांनी हत्या केल्याने संपुर्ण हिंदु समाजा मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिकार्यांनी घटनेचा निषेध करुन कन्हान पोलीस निरीक्षका मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन पाठवुन आरोपी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून फासी ची शिक्षा देण्याची मागणी केली आहे .
कन्हैयालाल तेली यांच्या आठ वर्षांच्या मुलाने सोशल मीडियात नुपूर शर्मा च्या समर्थनार्थ पोस्ट टाकली होती . दरम्यान ही पोस्ट आल्यानंतर विशिष्ट समाजातील लोकांकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्यांनी सहा दिवसांपासून दुकान बंद ठेवले होते. तसेच या बाबत पोलिसां कडे ही तक्रार दिली होती . परंतु पोलीस विभागाने या प्रकरणा कडे दुर्लक्ष केल्याने मंगळवार २८ जुन ला दुपारी २:३० वाजता च्या दरम्यान दोन नराधमांनी कापड मोजमापाचा बहाणा करून दुकानात घुसले व कन्हैयालाल तेली यांच्या तलवारीने गळा चिरून हत्या केली . सदर घटने नंतर संपुर्ण हिंदु समाजा मध्ये तीव्र रोष निर्माण झाल्याने कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिकार्यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या नेतृत्वात घटनेचा निषेध करुन व राजस्थान सरकार विरोधात जोरदार निर्दशने करुन कन्हान पोलीस निरीक्षक विजय जाधव यांचा मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन पाठवुन आरोपी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून फांसी ची शिक्षा देण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा कन्हान शहर डॉ मनोहर पाठक कामेश्वर शर्मा , विनोद किरपान , रिंकेश चवरे , शैलेश शेळकी , सौरभ पोटभरे , विक्रांत सोलंकी ,मयुर माटे ,सुरेश कळंबे ,संजय रंगारी , दिपंकर पानतावने , चिंतामन सारवे , तुलेशा नानवटकर , सुषमा मस्के ,प्रतिक्षा चवरे , सह आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …