*नयकुंड ते आमडीफाटा महामार्ग तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी*
*रामटेक विधानसभा युवक काॅंग्रेस पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड ते आमडीफाटा महामार्गावर अनेक महिन्या पासून रोड दुरुस्तीसाठी खोदकाम केले असुन व बांधकाम अर्धवट थांबले असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढल्याने रामटेक विधानसभा युवक काॅंग्रेस पदाधिकार्यांनी अध्यक्ष निखिल पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ नयकुंड ते आमडीफाटा महामार्ग तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे .
सावनेर आमडीफाटा या महामार्गाचे बांधकाम एच.जी. इन्फ्रा इंजि . कंपनीकडून केले असुन या महामार्गावर अनेक जागी भेगा पडल्याने अनेकदा लिपापोती केली असुन काही उपयोग झाला नाही . त्यामुळे दुरुस्तीसाठी नयाकुंड ते आमडीफाटा मार्गावर एका जागी मार्गाचा बराचसा अर्धा भाग खोदून अर्धा भाग मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला असुन या ठिकाणी थोडेफार दुरुस्ती बांधकाम केले मात्र उर्वरित बांधकाम अनेक महिन्या पासून थांबलेले आहे . या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते . त्यामुळे खोदलेल्या मार्गा जवळून प्रवाश्यांना व वाहतूक दारांना अडी अडचणीचा सामना करावा लागत असुन रात्रीला येथे लहान मोठ्या वाहानांच्या लांब रांगा रागलेल्या दिसतात एवढेच नव्हे तर या जागी विरुद्ध दिशेने चालणाऱ्या वाहनांचा प्रकाश डोळ्यावर येत असल्यामुळे असा खोदलेला मार्गाचा भाग दिसून न आल्यामुळे अनेक बाईकसवार या खोदकाम जागी पडून जखमी झाले . तर मोठे वाहणे आत घुसल्याच्या तक्रारी असल्याने रामटेक विधानसभा युवक काॅंग्रेस पदाधिकार्यांनी अध्यक्ष निखिल पाटील यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ नयकुंड ते आमडीफाटा महामार्ग तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे .