*ख्याती प्राप्त ट्रव्हल्सचा प्रवास ही आता असुरक्षीत*-*बांगडी ट्रव्हल्स मध्ये तरुणीचा वाहकाकडून विनयभंग*

*ख्याती प्राप्त ट्रव्हल्सचा प्रवास ही आता असुरक्षीत*

*बांगडी ट्रव्हल्स मध्ये तरुणीचा वाहकाकडून विनयभंग*

*वरोरा पोलिस स्टेशनमधे तक्रार दाखल !*

वरोरा प्रतिनिधी :–
*नुकताच डॉ. प्रियंका रेड्डी प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण समाजमन चिंतातुर असतांना नागपूर वरून चंद्रपूर ला जाणाऱ्या बांगडी ट्रॅव्हल्स मधील एका कर्मचाऱ्याने प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.*
*नागपूर येथून चंद्रपूर ला निघालेल्या बागडी या खाजगी ट्रव्हेल्स मध्ये एक तरुणी नागपुर येथुन चंद्रपूर ला जाण्यासाठी बसली होती. नागपूर ते वरोरा दरम्यान या तरुणीचा बस मधील कर्मचाऱ्याने विनयभंग केला असल्याची बाब ही ट्रव्हेल्स वरोरा येथील रत्नमाला चौकात पोहचताच पीडित तरुणीने घटनेची माहिती पोलिसांना दिली*
*बहुदा वाहक हा दारूच्या नशेत असल्याचे सुद्धा बोलल्या जाते. दरम्यान या नंतर सर्व प्रवाशांसह बस वरोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आली. वृत्त लिहीपर्यंत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती Mh 40 Bl 0468 हा बस क्रमांक असलेली ट्रव्हेल्स बस रात्री 8.30 ला वरोरा येथे पोहचली.*
*खाजगी ट्रव्हेल्समधे सुद्धा महिला सुरक्षित नसल्याने अशा खाजगी ट्रव्हेल्सवर बंदी आणली जावी अशी मागणी आता जनतेकडून होण्याची शक्यता आहे.*
*खाजगी ट्रव्हेल्समधून अवैध दारू,गांजा सह इतर अमली पदार्थाची वाहतूक होत असल्याच्या घटना उघडकीस येत असतांनाच आता प्रवासी ट्रव्हेल्समधे मुली व महिला सुरक्षित नसेल तर शेवटी त्यांचे संरक्षण होणार कसे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …