*भेंडाळा येथे घराची भिंत कोसळून एक ठार*

*भेंडाळा येथे घराची भिंत कोसळून एक ठार*

सावनेरः तालुक्यातील पाटणसावंगी नजिकच्या भेंडाळा येथे सतत पावसामुळे घराची भिंत अंगावर पडून 50 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मु्त्यू झाल्याची घटना 4 जुलै च्या मध्यरात्री घडली.*


*नरेंद्र देवराव मुसळे वय 50 वर्ष रा भेंडाळा असे घटनेत मृत झालेल्या इसमाचे नाव असुन माहितीनुसार सावनेर तहसील कार्यालयाबाहेर गेल्या अनेक वर्षांपासून भेंडाळा येथील रहिवाशी नरेंद्र मुसळे हा अर्जणवीस चे काम करत होता. त्याचे जुने घर ग्रामपंचायत जवळ आहे. घरी तो एकटाच राहत होता. 4 जुलैला परिसरात भरपूर पाऊस असल्याने सर्वच लोक आपापल्या घरी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना नरेंद्र मुसळे यांचे जुने घर अस्तव्यस्त व पडलेले दिसले. नरेंद्र हा त्यात दबला तर नाही ना अशी शंका तेथे जमलेल्या गावाकऱ्यांना वाटू लागल्याने पडलेल्या घरावरील टीनाचे छप्पर बाजूला करून बघितले असता नरेंद्र हा भिंतीच्या खाली मृतवस्थेत दबून दिसला. रात्रभर पाऊस पडत असल्याने त्याचे घर मध्यरात्री पडले व ते सकाळी शेजाऱ्यांना दिसले. त्यांच्या पार्थिव शरिरावर अंत्य संस्कार करण्यात आला. माजी मंत्री सुनील केदार यांनी मुसळे कुटुंबाची भेट घेऊन परिवाराला दिलासा दिला.*
*सदर घटनेचा पुढील तपास खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मानकर करीत आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …