*पारशिवनी येथे वन महोत्सव थाटात साजरा* *पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फावर वृक्षारोपन व वृक्ष रोपे वाटप*

*पारशिवनी येथे वन महोत्सव थाटात साजरा*

*पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फावर वृक्षारोपन व वृक्ष रोपे वाटप*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पारशिवनी : – सामाजिक वनिकरण पारशिवनी नागपुर विभागा व्दारे पारशिवनी ते करंभाड रस्त्याच्या दुतर्फा वर वृक्षारोपन व नगरपंचायात पारशिवनी कार्यालयात वृक्ष रोपे वाटप तसेच विविध कार्यक्रमा च्या आयोजन करून वन महोत्सव दिवस थाटात साजरा करण्यात आला.


वन महोत्सव दिनानिमित्त सामाजिक वनिकरण पारशिवनी नागपुर विभागा व्दारे शुक्रवार (दि.१) जुलै ला नगरपंचायत कार्यालय पारशिवनी प्रांगणात मा.श्रीमती डकरे, नगराध्यक्षा श्रीमती कुंभलकर व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपन करण्यात आले. त्यानंतर शनिवार (दि.२) ला सकाळी.११ वाजता मा. श्रीमती डकरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनात पारशिवनी ते करंभाड रस्ता दुतर्फावर वृक्ष लागवड करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सभापती सौ. मिनाताई कावळे, उपसभापती श्री चेतनजी देशमुख, सदस्य श्री संदिप भलावी, सदस्या श्रीमती तुळसा दिवेवार, श्रीमती मंगला निंबोने यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. त्यानंतर नगरपंचायत कार्यालय पारशिवनी येथे समृद्धी योजना अंतर्गत रोपे वाटपाचा कार्य क्रम करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्षा नगराध्यक्षा श्रीमती कुंभलकर, प्रमुख पाहुणे श्रीमती डकरे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल ठाकरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री व्हिजे येरपुडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री शेंडे यांनी केले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …