*भाजपा द्वारे डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२१ वी जयंती थाटात साजरी*

*भाजपा द्वारे डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२१ वी जयंती थाटात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान ला भाजपा कन्हान शहर द्वारे भारतीय जनसंघ व शिक्षाविद् , चिन्तक चे संस्थापक डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन रामभाऊ दिवटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे यांच्या हस्ते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . कार्यक्रमात उपस्थित तालुका अध्यक्ष अतुल हजारे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनील लाडेकर यांनी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जीवन चिरित्र्यावर पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेवक राजेंद्र शेंदरे , कामेश्वर शर्मा , भरत सावळे , नारायण गजभिए , अजय लोंढे , मयुर माटे , ऋषभ बावनकर , दिपनकर गजभिये , क्रिष्णा मेश्राम , राजेश देशभ्रतार , स्वाती पाठक , सुनंदा दिवटे , लक्ष्मी लाडेकर , संगीता देशभ्रतार सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …