*मोवाड पोलिस चौकीत व शहरात आषाढी एकादशी निमीत्य वृक्षारोपण*
नरखेड़ प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – आषाढी एकादशीचे औचित्य साधुन स्थानीक मोवाड पोलीस चौकी परीसरात वृक्षारोपण कार्यक्रम नरखेड ठाण्याचे
पोलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे तसेच वृक्षमित्र महादेवराव अरखेल यांचे शुभ हस्ते व त्यांचेच प्रमुख ऊपस्थीतीत पार पडला. भर पावसात हा कार्यक्रम घेण्यात आला असुन यात प्रामुख्याने वड, रीठा, अशोका, प्राजक्त, फणस तसेच विवीध फळांच्या २५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमाला मोवाड पोलीस चौकीचे हवालदार
साहेबराव मसराम, नायब पोलीस गजानन शेंडे, निलेश खरडे, शिपाई दिनेश कुमेरीया, मनिष ठाकरे, मिलींद राठोड, हेमंत बांबुलकर, वाहतुक शाखेचे समर्थ कोडापे, शिवहरी कांबळे, नरखेड येथील साहील अरखेल तसेच विनय अरखेड यांची यावेळी प्रामुख्याने ऊपस्थीती होती. एकादशीचा उपवास त्यात भर पावसात हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आल्याचे समाधान मात्र सर्व पोलीस कर्मचार्यांच्या चेहर्यावर दीसत होते. विशेष
म्हणजे वृक्षमीत्र महादेवराव अरखेल यांनी हे सर्व रोपटे त्यांच्याच प्रयत्नातुन विनामुल्य दान म्हणुन देण्याच्या संकल्पनेतुन कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामळे मोवाड पोलीस चौकीत महाएकादशीच्या पर्वावर हे वृक्षारोपण पार पडले. त्यांचे संगोपण व संवर्धनही योग्यरीत्या
करणार असल्याचे ठाणेदार जयपालसींग गिरासे यांनी कळवीले.
तसेस मोवाड शहरात वृक्ष मित्र तुषार वाडबुद्बे ,आकाश देवते,श्रीकांत मालधुरे यांनी 4 वृक्ष पिंपडाची व गेले अनेक वषेँ पासुन विठृल मंदीर परीसर मैदाना मागे व आठवळी बाजारा मधे 200 वर कडु निंब,वड,पिंपड,उबर,बेल,असे व काहीना विनामुलय दिलीत