*कोलार नदीत एक व्यक्ती वाहून गेला*
पाटणसावंगी – बोरूजवाडा येथून पटकाखेडी ला घरी जात असताना कोलार नदीचा पुल ओलडतांना प्रवाहात तोल गेल्याने वाहून गेल्याची घटना मंगळवार ला सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.
भोजराज रामराव वानखेडे वय ५० वर्ष रा.पटकाखेडी, ता. सावनेर ,असे वाहून गेलेल्या व्यक्ती चे नाव आहे. भोजराज हा कबाडी चा व्यवसाय करत होता. दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळी बोरूजवाडा येथून पटकाखेडी येथे जात असताना मार्गावर येणाऱ्या कोलार नदीच्या पुलावर त्याला दिसले. पुलावर असलेल्या पाण्यात सायकलने जाणे शक्य होणार नाही म्हणून नदीच्या काठावर सुरक्षित ठिकाणी सायकल ठेवून पायी जाण्यास निघाला असता पूल ओलांडतांना त्याचा प्रवाहात तोल गेला व नदीच्या पात्रात वाहून गेला..नदीच्या परिसरात त्याचा शोध घेणे सुरू असून सायंकाळी उशिरा पर्यंत शोध लागला नव्हता…