*हैद्राबाद पोलिस इनकाऊंटर वर समाजसेवींच्या प्रतिक्रिया*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*हैदराबाद च्या दुर्दैवी घटनेत डॉ प्रयंका वर अतीप्रसंग करुण जाळून टाकणारे चार आरोपींना घटनास्थळी तपासाकरिता नेले क्षआसता तेथून पोलिसांना हुल देऊण पळ काढल्या प्रकरणी पळत असलेल्या चारही आरोपींना इनकाउंटर मधे यमसदनी पोहचविणार्या हैदराबाद पोलिसांच्या या कारवाई चे आनेक मान्यवरांनी स्वागत केले आहे प्रस्तुत आहे काही समाजसेवींच्या प्रतिक्रिया…*
# आज पाहटेच्या दरम्यान हैद्राबाद येथील डॉ प्रियंका रेड्डी हीच्यावर अतीप्रसंग करुण जाळून देणार्या आरोपींना तपासाकरीता नेले असता तेथून पळ कढू पाहणार्या आरोपींचा खात्मा केल्याचे वुत्त कानावर पडताच आनंद झाला अश्या गुन्हेगारांना अश्याच शिक्षेची अपेक्षा आहे यामुळे असे घु्णीत कुत्य करण्याआधी आरोपी पन्नास वेळा विचार करेल व यामुळे अश्या घटनांवर आळा बसेल*
*किशोरी विजय बसवार*
(माजी नगर सेवीका न.प.सावनेर)
# *महिलांवर अश्या घु्नितकु्त्य करुण जुवंत जाळण्याचे प्रकरणात दिवसेन दिवस वाढ होत असुन अश्या नराधमांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वच स्तरावरुण होत आहे.तरीही शासन अश्या घटनांची दखल घेण्यात का उशीर करत आहे व लांब चालणारी न्यायालयीन प्रक्रीया मुळे ओरोपींच्या हिम्मती वाढत आहे हैद्राबाद पोलिसांनी केलेली कारवाई ही स्वागतायोग्य असुन पोलीसांच्या अश्या कारवाई मुळे असे आरोपींत भीतीचे वातावरण निर्माण होऊन अश्या घटनावर आळा बसेल*
*लता ढवळे*
(तालुका योग विस्तारिका पतंजली योग समिती सावनेर)
# *हैद्राबाद इनकाऊंटर घटना घडल्याचे वु्त्त अनेक वुत्तवाहिन्या वर आज सकाळपासून झळकत असून सामाजिक स्तरावरून या घटनेचे स्वागत केले जात आहे.भारतीय न्याय प्रणालीची अशी प्रचिलीती आहे की शंभर आरोपी सुटले तरी चालेल परंतू एकाही निर्दोशास शिक्षा होता कामा नये म्हणून फिर्यादीच्या परिवारास न्याय मीळवून घेण्यासाठी खुप लांब न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागते “निर्भाया”प्रकरण याचे ज्वलंत उदाहरण आहे.अश्या घटनांवर आळा बसविण्या करिता शासनाने अती जलद न्यायालये उभारुण होईल तीतक्या लवकर अश्या घटनेतील आरोपींना शिक्षा मिळाल्यास अश्या अप्रिय घटनांवर आळा बसेल मग आरोपी बालीक असो की नाबालीक याकडे बिल्कुल लक्ष देऊ नये*
*अँड्.राजेन्द्र बरेठीया*
(लीगल एडव्हाजर महाराष्ट्र न्यूज मीडिया)
#*हैद्राबाद पोलिस व डॉ प्रियंका रेड्डी प्रकरणातील चारही आरोपीत झालेल्या चकमकीचे मी एक महिला, आई,बहिन म्हणून स्वागत करते अश्या निष्ठूर आरोपीवर अश्यच कारवाई अपेक्षित असून यापुढे असे कु्त्य करण्याची कोणीही हिम्मत करणार नाही व माझ्या मते हैद्राबाद पोलिसांनी केलेली ही कारवाई संपूर्ण देशाला व न्याय पालिकेला दिशा देण्याचे कार्य करेल*
*डॉ जोत्सना धोटे*
(वरिष्ठ चिकित्सक सावनेर)
# *हैद्राबाद पोलिसांनी आज जे केले त्याचे मनापासून कौतुक करावेसे वाटते व संपूर्ण देशातील पिडित परिवारा सोबतच संपूर्ण देश अश्या घटनांचे स्वागत करत आहे.अश्याच कठोर पाऊलांची आज समाजास गरज आहे जेणेकरून कायद्याचा आड़ घेऊ पाहणारी अपराधिक प्रवु्त्तींचे धाबे नक्कीच दणानतील व अश्या कारवायांमुळे बलात्कार,जिवंत जाळन्या सारखे कु्त्य व आई बहिणींची छेड़ काढण्यासारख्या घटनेत लाक्षणीक कमी येईल*
*चंदू कामदार*
(सामाजिक कार्यकर्ते)
# *अश्या अमानवीय कु्त्य करणार्यांना हैद्राबाद पोलीसांनी त्याची खरी जागा दाखवून दिल्याबद्दल हैद्राबाद पोलिसांचे मी अभिनंदन व्यक्त करतो व सदर घटनेचे संपूर्ण देशातील पोलीसांनी अनुकरण करावे अशी अपेक्षा करतो*
*मंदार मंगळे*
(अध्यक्ष भारतीय जनता पक्ष युवा आघाडी)
#*देशात बलात्कार करुण जीवे मारणे,महिलांची छेड़ काढने म्हणजे सामान्य बाब समझनार्यां करिता हैद्राबाद पोलिसांनी केलेली कारवाई म्हणजे एक मोठे पाऊल असुन अश्याच कारवाई मुळे आता अश्या कु्रकर्त्यांमधे भीतीचे वातावरण निर्माण होऊण पुढे अश्या घटनां करु पाहणार्यांना आपल्या सोबतही असेही घडू शकते याची जान हैद्राबाद पोलिसांनी करुण दिली*
*अनूप गजभिये*
(समाजसेवी सावनेर)