*रायबासा तलावातील ओव्हरफ्लो वाहून नेणार्या नाल्याचे त्वरीत खोलीकरण करा*
*पीडित शेतकर्यांची आर्त हाक*
सावनेर ः तालुक्यातील केळवद लगत असलेल्या रायबासा गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक भुईसपाट होऊन लाखोचे नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे.सध्यास्थीतीत जवळपास आठ दहा शेतकर्यांच्या शेतातून सदर नाल्याचे पाणी वाहत आहे तर तालुका पाटबंधारे विभाग मात्र आपल्या कुंभकर्णी निद्रेतुन जागायला तयार नसल्याचे चित्र आहे.*
*मिळालेल्या माहितीनुसार ग्राम रायबासाचे शेतकरी सतीष राव,दिपक राव,प्रतीभा ससनकर,शामराव मालोदे,इश्वर शेन्डे,रामकृष्ण वैद्य,इंदू ससनकर सह अनेक शेतकऱ्यांचे शेत रायबासा तलावाचा पाझरा वाहून नेणार्या नाल्याकाठी आहे.सदर नाला हा पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त असुन वरील शेतकरी मागील दोन तीन वर्षापासून सदर नाल्याचे खोलीकरण करण्याची मागणी करत पाटबंधारे विभागाचे अभियंता व अधिकार्यांच्या पायपोटी करुण ही पाटबंधारे विभागाच्या निगरघट्ट अधिकार्यांना पाझर फुटत नसुन सदर नाला उथळ झाल्याने रायबासा तलावच्या ओव्हरफ्लोचे पाणी सतिष राव सोबतच इतरांच्या शेताचे बांधे फोडून शेताच्या मधोमध वाहत असुन सदर शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कपासी,तुर आदी सह संत्रा या उभ्या पीकाला आपल्या सोबत वाहून नेत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करत आहे.*
*असेच काही स्थीती आठवड्यात झालेल्या धार पावसाने रायबासा तलाव भरल्याने अचानक झालेल्या ओव्हर फ्लो व सामोरील नाल्याची उंची वाढल्याने ओव्हरफ्लोचे पाणी सदर शेतकऱ्यांच्या शेतातून वाहू लागले.सदर घटनेची माहीती रायबासा ग्रामपंचायतचे सरपंच सोनु रावसाहेब व पीडित शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता व अधिकारी या़ना देऊनही किहीही उपाययोजना होत नसल्याचे बघून मा.उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना लेखी निवेदन सादर करुण नाल्याचे खोलीकरण व रायबासा तलावाच्या ओव्हरफ्लो मुळे पीडित शेतकऱ्यांच्या शेतीत झालेल्या नुकसानीचे वेळीच सर्वेक्षण करुण त्वरीत नुकसानभरपाई देण्याची मागणी निवेदनातून करण्या आली आहे.तसेच सदर नाल्याचे खोलीकरण न करता पाटबंधारे विभागाचे पोकलेन मधुकर ढोबळे व प्रफुल ढोबळे यांच्या शेताजवळ मागील मे व जुन असे सलग दोन महिने उभी राहण्याच्या घटनेची चौकशी करुण दोषींवर योग्य कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे*