*कांद्री आणि टेकाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी* *विविध ठिकठिकाणी भजन , कीर्तन , आणि खीर वाटप कार्यक्रमाचे आयोजन*

*कांद्री आणि टेकाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी*

*विविध ठिकठिकाणी भजन , कीर्तन , आणि खीर वाटप कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – परिसरातील कांद्री आणि टेकाडी येथे गुरुपौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन विविध कार्यक्रमाने गुरुपौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .

*त्रिशरण बौद्ध विहार , कांद्री*

कांद्री संताजी नगर येथील त्रिशरण बौद्ध विहार मध्ये गुरुपौर्णिमा पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन भगवान गौतम बुद्ध यांचे मूर्ति चे अनावरण व परित्राण पाठ केले व परिसरात खीर वाटप करुन गुरुपौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी भगवान नितनवरे , कैलाश शेंडे ,भोजराज राउत , प्रलाद वाघमारे ,सुदाम नितनवरे , भीमराव डोंगरे ,धर्मेंद्र गणवीर ,सचिन वासनिक , सिंधु वाघमारे , रमा वासनिक , शिला गणवीर , रत्नमाला चव्हाण सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

*हनुमान मंदिर टेकाडी , कन्हान*

टेकाडी हनुमान मंदिर येथे गुरुपौर्णिमा निमित्य भजन संध्या चा भक्ति पर गिताचा कार्यक्रम जय रघुनन्दन भजन मंडळ टेकाडी द्वारे आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमात मंदिरात विधिवत पूजा अर्चना करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असुन भजन कीर्तन करुन गुरुपौर्णिमा पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी ललित चिचुलकर , मनोज लेकुरवाडे , प्रज्वल गाडबैल , सौरभ नाकतोडे , लोकेश चिंचुलकर , नंदु सातपैसे , अंकित लक्षने , भावेश गोले , आकाश गाडबैल , आकाश घोगरे , मयुर सेलोकर , भुषन खोरे , अभि वासाडे , हर्श बोराडे
सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …