*पारशिवनी तालुक्यात नदी च्या पुरामुळे ३० गावे बाधित , ६० घर पडले , एकुण २५० हेक्टर शेतींच्या पीकांचे नुकसान* *आदिवासी भागातील रस्ता आणि पुलीया गेला वाहुन , आज पेच धरणाचे १६ दरवाजे पैकी ८ दरवाजे उघडले* *तालुक्यात एकुण ५४७.६२५ मिमी पावसाची नोंद * *नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *तहसीलदार प्रशांत सांगडे व संबंधित अधिकार्यांची माहिती*

*पारशिवनी तालुक्यात नदी च्या पुरामुळे ३० गावे बाधित , ६० घर पडले , एकुण २५० हेक्टर शेतींच्या पीकांचे नुकसान*

*आदिवासी भागातील रस्ता आणि पुलीया गेला वाहुन , आज पेच धरणाचे १६ दरवाजे पैकी ८ दरवाजे उघडले*

*तालुक्यात एकुण ५४७.६२५ मिमी पावसाची नोंद *

*नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

*तहसीलदार प्रशांत सांगडे व संबंधित अधिकार्यांची माहिती*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी काठावरील ४३ गावातील नागरिकांना पुराचा फटका बसल्यामुळे नागरिकांचे व शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पुरामुळे ३० गावे बाधित तर ६० घर पडले आणि एकुण २५० हेक्टर शेतींच्या पीकांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली .


तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसा पासुन सतत मुसळधार पाऊस पडत असुन बुधवार १३ जुलाई पर्यंत एकुण ५४७.६२५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असुन नवेगांव खैरी पेंच धरणात गुरुवार पर्यंत ९४% जलसाठा असल्याने धरणाचे दोन दरवाजे दुपारी २:३० वाजता च्या दरम्यान उघडण्यात आले होते अशी माहिती देत पेंच पाटबंधारे उपविभागीय अधिकारी एन एच सावरकर आणि ज्युनियर इंजिनियर विशाल दुपारे यांनी सांगितले होते कि धरणात जेव्हा पर्यंत ९०% टक्के जलसाठा होत नाही तेव्हा पर्यंत दोन दरवाजे उघडेच राहतील अशी माहिती दिली होती . परंतु गुरवार ला पहाटे ते आज शुक्रवार सकाळ पर्यंत जोरदार पाऊस झाल्याने धरणात एकुण ९७% टक्के जलसाठा झाल्याने आज सकाळी ८:०० वाजता पासुन पेंच धरणाचे पुन्हा चार दरवाजे उघडण्यात आले असुन दुपारी पुन्हा चार दरवाजे असे एकुण आठ दरवाजे मधुन कन्हान नदी पात्रात पाणी सोडल्याने नदी चे पाणी वाढत असल्याने नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .
सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच धरणाचे १६ दरवाजे बुधवार ला उघडण्यात आल्याने कन्हान आणि पेंच नदी ला भयंकर पुर आल्याने नदी काठावरील ३० गावे बाधित तर ६० घर पडले आणि एकुण २५० हेक्टर शेतींच्या पीकांचे नुकसान झाल्याने महसुल विभाग व कृषी विभाग विविध भागाचा दौरा करुन पंचनामा करुन रिपोर्ट तयार करत आहे व असा अंदाज आहे कि घर पडण्याचा आणि पीकांचे नुकसान चा आकडा वाढु शकतो अशी माहिती महसूल विभाग आणि कृषि विभाग च्या अधिकार्यांनी दिली . तसेच या पुरा मध्ये आदिवासी भागातील घाटकुकडा ते ढवलापुरा गावातला कच्चा रोड पाण्यत वाहुन गेला आणि घाटपेंढरी ते नरहर ला जोडणारा पुलिया वाहुन गेल्याने नागरिकांनी तात्काळ उपाय योजना करुन रोड शुरु करण्याची मागणी केली आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …