*केंद्र सरकारची “अग्निपथ” योजना रद्द करण्याची मागणी*
*काॅंग्रेस पारशिवनी तालुका पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – केंद्र सरकार ने देशात अग्निपथ योजना लागु केल्याने काॅंग्रेस पारशिवनी तालुकाच्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष दयाराम भोयर यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवुन अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी केली आहे .
निवेदना सांगितले कि केंद्र सरकार ने जी अग्निपथ योजना लागु केली आहे ती योजना १८ ते २२ वयोगटांच्या मुला – मुलींसाठी अत्यंत दिशाहिन व त्यांचे भविष्य उद्ध्वस्थ करणे सारखी असुन अश्या योजने च्या अखिल भारतीय काॅंग्रस पार्टी च्या पदाधिकार्यांनी विरोध केला असल्याने काॅंग्रेस पारशिवनी तालुकाच्या पदाधिकार्यांनी अध्यक्ष दयाराम भोयर यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांचा मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवुन अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी दीपक भोयर , प्रदीप दियेवार , बंटी निंबोने , प्रेमचंद कुसुंबे , इन्द्रपाल गोरले , प्रवीण शेलारे , कैलास ठाकरे , रामभाऊ ठाकूर , शालिक ढ़ोंगे , सुभाष तळस , डुमन चकोले , भुजंग ठाकरे , विठ्ठल वडस्कर , देवराव इंगळे , रविंद्र गुडदे , कृष्णा रांगणकर , वैभव मानवटकर , अनिकेत निंबोणे , सह आदि पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .