*वराडा येथुन दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले* *कारवाई दरम्यान चार दुचाकी वाहनासह एकुण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*वराडा येथुन दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले*

*कारवाई दरम्यान चार दुचाकी वाहनासह एकुण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस सात कि मी अंतरावर असलेल्या वराडा शिवारात फिर्यादी सुरज तांदुळकर यांची दुचाकी वाहन किंमत ५०,००० रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ३३३/२२ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असल्याने सदर प्रकरणातील आरोपीचा शोध कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चनकापुर क्वार्टर खापरखेड़ा येथे धाड घातली असता येथुन दोन आरोपी ला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन चार दुचाकी वाहना सह एकुण १,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली .
नागपूर ग्रामीण जिल्हयात मोटर सायकल चोरीचे प्रमाण दिवसन दिवस वाढत असल्याने नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.श्री विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण चे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली . गुरुवार दिनांक १४ जुलाई रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण चे पथक कन्हान उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीती दाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की , पोलीस स्टेशन खापरखेडा व नागपुर ग्रामीण हद्दीतुन चोरी केलेल्या दुचाकी आरोपी रोहीत वर्मा नावाचे इसमाने व त्याचा साथीदार आरोपी इशाक खान याचे सोबत चोरून आरोपी रोहीत वर्मा राहत असलेल्या चनकापुर येथील त्याचे घराचे आवारात ठेवलेल्या असुन त्या दुचाकी वाहन ते विकण्याचे तयारीत आहेत . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चनकापुर वेकोली क्वॉर्टर कं , ४२ / ३ खापरखेड़ा येथे धाड घातली असता आरोपी नामे- १) रोहीत रामनरेश वर्मा वय २१ वर्ष रा . पाताखेडा ता घोडाडोगंरी जि . बैतुल यांच्या क्वॉर्टरचे मागे असलेल्या रूमची पाहणी केली असता त्याचे पडीत रूममध्ये चार वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर सायकल दिसुन आले . आरोपी रोहित वर्मा ने सदर मोटरसायकल ह्या त्याचा मित्र आरोपी २ इशाक खान राहणार गोदिंया याचेसह मिळुन वेगवेगळया चोरी केल्याचे कबुल केले . आरोपी इशाक फिरोज खान वय २१ वर्ष राहणार फूलचुर पेठ आयटीआय गोदिंया यास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सुध्दा आरोपी रोहीत वर्मा सोबत सदरच्या मोटरसायकल चोरी केल्याचे सांगीतले . सदर कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी १) रोहित वर्मा , २) इशाक फिरोज खान यांना अटक करुन त्यांचा ताब्यातुन काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस , बिना क्रमांकाची , चेसिस क्रमांक एमबीएलएचएडब्लु ११३१५१०२२५२ किंमत ५०,०० रुपए सह एकुण ०४ मोटर सायकल एकुण किंमत १,२५,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर , अपर पोलिस अधीक्षक राहुल माखणीकर यांच्या मार्गदर्शनात , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , सपोनि अनिल राऊत , पोहवा ज्ञानेश्वर राऊत , विनोद काळे , अरविंद भगत , प़ोना शैलेश यादव , विरेंद्र नरड , प्रणय बनाफर , रोहन डाखोरे , चालक सफौ साहेबराव बहाळे यांचे पथकाने ही कार्यवाही यशस्विरित्या पार पाडली .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …