पाटणसावंगी येथील-*चोरांनी रोकडसह एटीएम मशीनच केले लंपास*.

*ब्रेकींग न्यूज*
*चोरांनी रोकडसह एटीएम मशीनच केले लंपास*.

*पाटणसावंगी येथील घटना*

*पाटणसावंगी.चोरांनी दागदागिने, पैसे नाही तर चक्क रोकडसह एटीएम मशीनच पळवुन नेल्याची धक्कादायक घटना सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी – खापा टी पॉईंटवर घडली.*

पाटनसावंगी प्रतिनिधि -आशीष लोधी

*सविस्तर वृत्त असे की महामार्गालगत असलेल्या सूतगिरणीच्या भिंतीला लागून इंडियन ओवरसिज बँकेचे एटीएम अनेक वर्षापासून आहे. ते मशीनच चोरट्यांनी रोख रकमेसह लंपास केल्याची घटना शुक्रवार रात्री ३ वाजताच्या सुमारास दरम्यान घडली. या एटीएम मशीनमध्ये २ लाख ८३ हजार ६००रू. असून चोरट्यांनी मशीनसह रक्कम चोरी करून नेली. यासंदर्भात सावनेर येथील बँकेचे व्यवस्थापक अंशुमन झा यांनी पाटणसावंगी पोलीस चौकीत तक्रार केली आहे.*
*यासंदर्भात अधिक माहीती अशी की, नागपूर सावनेर महामार्गालगत खापा पाटणसावंगी टी पॉईंटवर सूतगिरणीच्या भिंतीला लागून असलेल्या एका गाळ्यात इंडियन ओवरसीस बँकेचे अनेक वर्षांपासून ई पी एस कंपनीचे एटीएम असून आज (शुक्रवार दि.६ दिसें रोजी) पहाटे 3 च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या एटीएम सेंटरचा दरवाजा उघडून सब्बल रॉड च्या सहाय्याने अज्ञात चारचाकी गाडीद्वारे चोरुन नेले. त्या सोबतच चोरांनी चतुराई दाखवत एटीएम मशीन मध्ये असलेले सी सी टी वी कॅमेरा व रेकॉर्डरही चोरुन नेले. या एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी बँकेने सुरक्षा रक्षकाची व्यवस्था केलेली नव्हती. हे मशीन 15 दिवसापासून तांत्रिक अडचणींमुळे बंद होते तर दोन दिवसांपूर्वीच सुरु झाले होते हे विशेष..*

*चोरीची घटना कळल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत पूलेकर यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळाला भेट देत पाहणी केली.यावेळी बँकेचे व्यवस्थापक अंशुमन झा , सुरक्षा अधिकारी अनुज कुमार , एटीएम मशीन ई पी एस कंपनी चे क्षेत्र अधिकारी जितेंद्र बसाखेत्रे उपस्थित होते. अज्ञात चोरट्यांविरोधात पाटणसावंगी पोलीस चौकीत फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक निशांत पुलेकर,कृष्णा जूनघरे , संदीप नागरे, हेमराज कोल्हे, करीत आहेत.*

*पोलीस चौकी व सूतगिरणीचे सुरक्षा रक्षकाची खोली या एटीएम पासुन काही अंतरावर असूनही चोरांनी मशीनसह मोठ्या रकमेची चोरी केल्याने चोरांनी पोलिसांनाच मोठे आव्हान दिल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …