*कन्हान नदी काठावरील कांद्रीच्या पंप हाऊस मधुन अज्ञात चोरट्यांने १९३०० रूपयाचे सामान केले चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान नदी काठावरील कांद्रीच्या पंप हाऊस मधुन अज्ञात चोरट्यांने १९३०० रूपयाचे सामान केले चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नदी काठावरील राणी बगीचा पिपरी येथील पंप हाऊस मधिल पंपचे केबल, लोखंडी सिडी, लोखंडी बोर्ड, सबल व इतर साहित्य असे एकुण १९ ,३०० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध सुरु केला आहे .

परिसरात मागील १० दिवसा पासुन सतत पाऊस सुरू असुन व पेंच धरणाचे पाण्याचा विसर्गाने कन्हान नदी भरून वाहत असल्याने ग्राम पंचायत कांद्री ला पाणी पुरवठा करण्याऱ्या गाडेघाट रोड राणी बगीचा पिपरी कन्हान नदी काठावरील पंप हाऊस मध्ये १० ते १२ दिवसा पासुन सुरक्षा रक्षकाची डयुटी लावण्यात आली नव्हती. शनिवार (दि.१६) जुलै ला ग्राम पंचायत कांद्री पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पंप हॉउस सुरू करण्याचे ठरवुन सर्व जण राणी बगी चा गाडेघाट रोड पिपरी कन्हान नदी काठावरील पंप हॉऊस ला गेले असता तिथे ईलेक्ट्रीक केबल उखळले ला दिसल्याने सर्वांनी तिथे असलेला सामानाची पाहणी केली असता पंप हॉउस मधिल १) मोटर पंपचे केवल८० मिटर अंदाजे किमत १५००० रू.२) लोखंडी सिडी अंदाजे किंमत २००० रू.३) एक लोखंडी बोर्ड अंदाजे किंमत १५०० रू. ४) ९ लोखंडी सबल व ईतर साहित्य अंदाजे किंमत ८०० रूपये असा एकुण १९,३ ०० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने (दि. १५) जुलै चे रात्री चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी कांद्री ग्रामपंचायत पुरवठा कर्मचारी फिर्यादी बाबुराव ताराचंद मनगटे वय ५१ वर्षे राह. कांद्री कन्हान यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अप क्र. ४२२/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …