*लग्न जुळवुन देण्याचा नावावर फसवणुक* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*लग्न जुळवुन देण्याचा नावावर फसवणुक*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – शहरातील इंदिरा नगर येथील रहीवासी यांना आरोपीने दोघांचे लग्न जुळवुन देतो असे खोटे बोलुन १५,००० रुपयाची फसवणुक केल्याने  पोलीसांनी नरेश बर्वे यांचा तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार नरेश कचरुजी बर्वे (५०) रा. इंदिरा नगर कन्हान यांच्या कडे  मुकेश रमेश राजपुत रा. टेकाडी साई डेयरी फार्म येथे मागील पाच वर्षा पासुन काम करत आहे. त्याचे कुठलेही नातेवाईक नसल्याने तो नरेश बर्वे यांच्या कडे मुला सारखाच राहत असुन त्याची देखभाल आणी इतर सर्व गोष्टी कडे नरेश बर्वे काळजी घेतात. त्याचे लग्न करण्याकरीता मुलगी पाहत असतांना फेसबुक वरुन मॅरेज ब्युरो पेज वर दिलेला मो.क्र.वर संपर्क करुन मुकेश रमेश राजपुत यांची पुर्ण माहिती बायोडाटा  (ता.10) जुन 2022 रोजी देण्यात आली व त्यांनी मुली संबधित माहीती दिली तिचे फोटो, बायोडाटा नरेश बर्वे यांना पाठविले ते बघितल्या नंतर ती मुलगी कल्पना राजाराम राना (25 )रा. विष्णुवाडी मु.पो. जिल्हा बुलढाणा व मुलीच्या आई यांचा सोबत बोलणे करुन दिले.आरोपी विठ्ठल पाटील मॅरेज ब्युरो यांनी नरेश बर्वे यांना सांगितले कि दोघांनाही स्थळ पसंत आले म्हणुन माझे रजिस्ट्रेशन फिस 5000 रु. आपल्याला भरावे लागेल. तेव्हा पुढची प्रक्रिया बोलनी सुरु करणार. असे वेळोवेळी नवीन कारण सांगून पैसे अकाऊंटला मागुन घेतले. नरेश बर्वे यांना संशय आल्याने आरोपी विठ्ठल पाटील यांना त्यांचा नेमका पत्ता माहीती विचारले असता उडवा उडविचे उत्तर देवु लागला व मी ता.20 जुलै 2022 पर्यंत माझे कार्य व्यस्त असल्यामुळे आपल्याशी बोलु शकणार नाही असे सांगीतले. विठ्ठल पाटील याने नरेश बर्वे यांच्या कडे काम करीत असलेला मुलगा मुकेश राजपुत व अश्विण बर्वे या दोघांचे लग्न जुळवुन देतो असे सांगुन एकुण 15000 रुपये. घेवुन मुलीचा खोटा पत्ता देवुन नरेश बर्वे यांची फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी नरेश बर्वे यांच्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल पाटील यांच्या विरुद्ध कलम ४२० भादवि सहकलम ६६(ड) मा.त. अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस  निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …