*जुनीकामठी येथे विद्यार्थी व महिला, पुरूष कामगारांना छत्री वाटप*

*जुनीकामठी येथे विद्यार्थी व महिला, पुरूष कामगारांना छत्री वाटप*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – अग्रेसर महिला मंडळ नागपुर (सुरभी) व जुनी कामठी चे माजी उपसरपंच, ग्रा प सदस्य भुषण इंगोले यांचा संयुक्त विद्यमाने ग्राम पंचायत परिसरात आणि श्री क्षेत्र कामठेश्वर मंदीर येथे पावसाळ्यात गरीब गरजु विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतक री, कामगार, गाई म्हशी चारण्यारे आदी गरजुंना १५० छत्री वाटप करण्यात आले.


जुनीकामठीच्या गरजु विद्यार्थी, महिला, पुरूषाना छत्री वाटप कार्यक्रम जि प माजी उपाध्यक्ष मा. शरद डोणेकर यांच्या अध्यक्षेत आणि सामाजिक कार्यकर्ते कमलाजी गोयल (बुआजी), माजी उपसरपंच भुषण इंगोले, कन्हान चे सामाजिक कार्यकर्ते दिनेश ढोले, राम जुनघरे, संजय खंंते, मंदा टेकाम (करवती), रूपेश टे काम, शिक्षक सुनील पाटील, लिना खाडे मॅडम, ममता रहाटे मॅडम, विजया धाडसे मॅडम, सौरभ डोणेकर , पत्रकार आकाश पंडितकर आदींच्या प्रमुख उपस्थित पावसाळ्यात शिक्षणास आणि कामावर जाण्याकरिता गरजु ३७ विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतकरी, काम गार, गाई म्हशी चारण्यास आदी कामावर जाण्याकरिता गरजु ११३ महिला, पुरूष असे एकुण १५० विद्यार्थी, नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले. कार्यक्रमा चे संचालन महेंद्र चहांदे यांनी तर आभार शुभांगी इंगोले यांनी व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता अग्रेसर महिला मंडळ नागपुर (सुरभी) च्या रीमा गर्ग, यमुना अग्रवाल, सुनीता अग्रवाल, सीमा अग्रवाल, पुष्पा पोद्दार, निमाजी अग्रवाल व जुनी कामठी चे माजी उपसरपंच आणि ग्रा प सदस्य भुषण इंगोले आदीने अथक परिश्रम करून मौलाचे सहकार्य केले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …