*भाजपा कन्हान शहर द्वारे शहिदांना दिली श्रद्धांजलि*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – भाजपा कन्हान शहर द्वारे कारगिल विजय दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले होते . या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित भाजपा अनु: सुचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांनी कारगिल युद्ध बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकार्यांनी व सदस्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन कारगिल युद्धात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
या प्रसंगी कामेश्वर शर्मा , संजय रंगारी , भरत सावळे , सदाशिव भिवगडे , शैलेश शेळके , महेंद्र चव्हान , माधव वैद्य , विनोद किरपान , नारायण गजभिए , शालिनी बर्वे , प्रतीक्षा चवरे , सौरभ पोटभरे , श्याम किरपान , लक्ष्मीकांत कमाले , रवि राणे , चंदु जयपुरकर सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .