३० वर्षानंतर पहिल्यांदाच झाली पल्ले ग्रा.पं.निवडणूक
पेरमिली:- पेरमिली वरुन ७ कि.मि. अंतरावर असलेल्या पल्ले येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आज दिनांक ८.१२.२०१९ ला अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखले जाणारी पल्ले येथे पहिल्यांदाच ग्रा.पं.निवडणूक करण्यात आली. या वेळी नक्षलसप्ताह असुन सुध्दा मतदारांनी निवडणूक केले.या वेळी कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आले.या वेळी बंदोबस्तासाठी अहेरी येथील उपविभागीय पोलीस अधीकारी बजरंग देसाई उपस्थित होते व निवडणूक शांततेत पारपडला.