*भाटीया कोलवासरी येथे अवैद्य कोळसा टालवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड* *अवैद्य कोळसा टाल वरून ३८,४०० रुपयाचा कोळसा जप्त , फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*भाटीया कोलवासरी येथे अवैद्य कोळसा टालवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड*

*अवैद्य कोळसा टाल वरून ३८,४०० रुपयाचा कोळसा जप्त , फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस दहा किमी अंतरावर असलेल्या भाटीया कोलवासरीचा विरुद्ध दिशेस
अवैध कोळसा टालवर उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी धाड घातली असता तिथे ३८,४०० रूपयाचा चोरीचा अवैध कोळसा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी नागनाथ चरणदास खोब्रागडे हे २२ जुलै चे सकाळी ८:०० वाजता ड्युटी वर आले असता अंदाजन सायंकाळी ०७:०० वाजता च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी नागनाथ चरणदास खोब्रागडे यांना फोन करुन कळविले कि गोंडेगाव शिवारात भाटीया कोलवासरीचा विरुद्ध दिशेस असलेल्या मातीच्या रस्त्याचा कडेला झाडीझुडपीत अंदाजे ९ ते १० टन कोळसा पडलेला आहे . अश्या माहिती वरुन नागनाथ चरणदास खोब्रागडे हे आपल्या स्टाॅप सह घटनास्थळी पोहचले असता तिथे
उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व पोलीस स्टाॅप हजर होते . उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी नागनाथ चरणदास खोब्रागडे यांना सांगितले कि सदर कोळसा हा आरोपी हबीब शेख यांनी चोरुन येथे जमा केला आहे . सदर कोळसा आपण डब्लु सी एल ला रितसर जप्त करुन घ्या असे उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी सांगितल्याने नागनाथ चरणदास खोब्रागडे यांनी कोळसा उचलण्याकरिता डब्लु सी एल मधुन प्रीलोडर मागितले असता प्रीलोडर येण्यास उशिर होत असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांनी पोस्टे कन्हान येथे फोन करुन पोलीस स्टाॅफ बोलवुन घेतले व त्यानंतर थोड्यावेळाने प्रीलोडर व ट्रक क्रमांक एम एच ४० सीडी १९१३ तिथे बोलवुन घेतले प्रीलोडर च्या मदतीने सदर कोळसा भरुन त्याचे वजन केले असता कोळस्याचे वजन ९६०० किलो इतके वजन भरले असुन प्रती किलो ४ रु प्रमाणे एकुण ३८४०० रुपयाचा कोळसा जप्त करुन कोल डेपो गोंडेगाव ओसीएम येथे जमा केले
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी नागनाथ चरणदास खोब्रागडे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून आरोपी हबीब शेख
यांचा विरुद्ध कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान , कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …