पाटणसावंगी शिवारात मोहफुलाची दारू पकडली
पाटणसावंगी प्रतिनिधी- प्रशांत सांभारे
पाटणसावंगी पोलीस चौकीच्या हद्दीतील असलेल्या इटनगोटी येथे पोलिसांनी मोहफुलाची दारू पकडली. एलसीबी पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान केली. यात पोलिसांनी चारचाकी वाहनासह १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाटणसावंगी पोलिसांचे पथक संदर्भात गस्तीवर असताना धापेवाडा-पाटणसावंगी मार्गाने इटनगोटी गावाजवळ मोहफूल दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गस्तीवर असतांना संशयास्पद वाहन इटनगोटी गावाजवळ आढळले. त्या दारु वाहतूक करणाऱ्या कार चालकाने पोलिसांना पाहून पाळण्याचा प्रयत्न करते वेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली त्यात आरोपींना किरकोळ जखमा आल्या.अपघात ग्रस्त कार ची चौकशी करत असतांना त्यात टायरच्या ट्यूब मध्ये दारु आढळली. आरोपी अविनाश पवार वय २८ रा.तिडंगी, विक्की चंद्रिकापुरे, ३० , सुनील धुर्वे वय २२ दोघेही रा. पिपळा डा.ब यांना व एमएच-४०/सिएम -४६२२ क्रमांकाची चारचाकी व ४०० लिटर मोहफुलाची दारू ताब्यात घेतली. दरम्यान, आरोपींची चौकशी केली असता, पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीची मोहफूल दारू चारचाकीने आरोपींनी तिडंगी येथून आणला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिन्ही आरोपींना अटक केली. ही कारवाई कृष्णा जुनघरे,देवेंद्र रडके, lcb चे निरीक्षक अनिल जिठ्ठावार , नरेंद्र गौरखेडे ,बाबा केचे चंद्रशेखर घडेकर विनीत गायधने पथकाने केली.