*शालेय शिक्षकांच्या स्पर्धांचे आयोजन होणार*
सावनेरः सावनेर येथे झालेल्या मुख्याध्यापक व शारीरिक शिक्षक यांच्या सभेत स्वातंत्र्याचा सूवणऀमहोत्सवानिमीत्त शालेय व तालुका स्तरीय विविध कार्यक्रमांचे आयोजन व नियोजनाबाबत सविस्तर चर्चा सत्र संपन्न झाले.यात प्रामुख्याने सूवणऀ महोत्सवी शिक्षक उत्सव साजरा करण्यात येणार आहे.त्यासाठी शिक्षणाधिकारी नागपूर यांचे सुचनेनुसार शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचे निश्र्चित झालेले आहे.*
*त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यासाठी शारीरिक शिक्षक मंथन मंचाची स्थापना करण्यात आली.सावनेर तालुक्यासाठी सुद्धा शारीरिक शिक्षक मंथन मंच स्थापन करण्यात आलेला आहे.अध्यक्ष सदानंद कळंबे,सचिव योगेश बन. कोषाध्यक्ष सुरेंद्र बनसिंगे.तर प्रशांत पुरी,धैयऀशिल सुटे,स्नेहल नागरे.सुनंदा डहाके यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.*
*उपरोक्त मंच व मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनानुसार सावनेर तालुक्यातील शिक्षकांच्या स्पर्धांचे आयोजन व नियोजन करण्यात येणार आहे.*