*कन्हान शहर विकास मंच द्वारे अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती थाटात साजरी*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती थाटात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे जयंती थाटात साजरी करण्यात आली .
सोमवार दिनांक १ आॅगस्ट ला साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष कांद्री ग्रामपंचायत सदस्य सिंधु वाघमारे यांच्या हस्ते व मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निबांळकर , प्रल्हाद वाघमारे यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , हरीओम प्रकाश नारायण , सुरेश आंबीलडुके , धर्मेंद्र गणवीर , सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी केले तर आभार रुषभ बावनकर यांनी मानले .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …