*अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या..*
*कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावातील घटना*
*अत्याचार करून खून करण्यात आल्याचा गावकर्यांचा संशय*
*घटनास्थळावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट*
कळमेश्वर प्रतिनिधि- सतीश नांदे
कळमेश्वर
महिलांवर होणारे अत्याचार काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता एका 5 वर्षीय मुलीची घरा जवळील संजय भारती राहणार नागपूर यांच्या शेतामध्ये दगडांनी ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीवर अत्याचार झाल्याची दाट शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेटल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नीलिमा शांताराम भलावी वय 5 वर्ष असे मृतक मुलीचे नाव आहे.
हैदराबाद येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असतानाच या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केला. हैदराबाद येथे तरुणीवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजं असतानाच आता एका अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून तोंडामध्ये कापड आणि काड्या कोंबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा दाट संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावांमध्ये ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक नीलम शांताराम भलावी वय 5 वर्ष ही आपल्या आई-वडिलांसह कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावांमध्ये झोपडीमध्ये राहते. शेवंती वय 25 असे तिच्या सख्या आईचे तर रहीवंती असे तिच्या सावत्र आईचे नाव असून ति आई-वडिलांसह लहान बहीण समीक्षा,वय 3 तर अश्विनी वय 5 आणि सागर 3 वर्ष या सावत्र बहिण-भावासह राहत होती. तिचे आईवडील मोलमजुरी चे काम करतात. ती गावातीलच अंगणवाडीमध्ये बहिण-भावासह शिकायला जायची. ज्या ठिकाणी तिची हत्या करण्यात आली त्याच शेतातून ती नेहमीप्रमाणे अंगणवाडीमध्ये आपल्या बहीण-भावांसह ये-जा करायची. या गावातच घरापासून लांब तिच्या आईची आई संत्री उईके आणि आजोबा नंदू उईके यांच्याकडे ती अंगणवाडी संपल्यानंतर नेहमीप्रमाणे ये-जा करायची.मात्र दिनांक 6 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान ती अंगणवाडीतून घरी आली आणि घरापासून गावातच राहणाऱ्या तिच्या आजीकडे जाते असे सांगून ती घरून एकटीच निघून गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही घरच्यांना ती तिच्या आजीकडे गेली असावी तर आजी-आजोबांना ती तिच्या घरीच असावी असा समज झाला. मात्र घरून गेलेली मुलगी दुसऱ्या दिवशी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ही दोन्हीकडे मिळून आली नाही. त्यानंतर काल उशिरा सायंकाळी 5वाजता दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीनंतर कळमेश्वर पोलिसांनी तिचा रात्रीपर्यंत शोध घेतला मात्र तिचा सुगावा न लागल्याने आज दिनांक 8डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पासून पोलिसांकडून परत तिचा शोध घेण्यात आला .शोध घेत असताना ज्या शेतातून ती ये जा करायची त्या शेतात असलेल्या तुरीमध्ये मध्यभागी ती मृतावस्थेत दिसून आली. यावेळी तिच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा आणि काडी कोंबण्यात आल्याची माहिती घटनास्थळाहून प्राप्त झाली. तसेच घटनास्थळावर एक दगड रक्ताने माखलेला आढळून आला. याच दगडाने तिची हत्या केली असावी असा संशय प्राथमिक दृष्ट्या पोलिसांनी व्यक्त केला.तर तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त करून आरोपीला तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सांबरकर , पोलीस निरीक्षक मारुती मुळक, यांच्यासह गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण, सावनेर पोलीसांचा मोठा ताफा घटनास्थळावर पाचारण करण्यात आला होता.यावेळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले मात्र श्वान घटनास्थळावरून बस स्टँड वरील पान टपरी पर्यंत जाऊन परत आले. घटनास्थळावरून मुलीचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर मेडिकल कॉलेज येथे रवाना करण्यात आले असून कळमेश्वर पोलिसांनीअज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाअसून संजय देवराव पुरी राहणार सावंगी मोहगाव हल्ली मुक्काम लिंगा या शेतामध्ये पाणी ओलणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.घटनास्थळावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती घटनास्थळावर कुणालाही जाऊ देण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता. प्राथमिक माहिती देण्यास अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांनी पत्रकारांना टाळाटाळ केली.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, खून झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असून मृतक मुलीला उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज येथे नेऊन डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यावरच पुढील कारवाई करण्यात येईल.पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल येण्याची पोलीस वाट पाहत आहेत. हा अहवाल मिळताच पोलीस पुढील तपास करण्यास अधिक मदत होईल.
छायाचित्रांमध्ये घटनास्थळावर गावकऱ्यांची मोठी गर्दी आणि तपास करताना पोलिस अधिकारी.